शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
3
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
4
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
5
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
6
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
7
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
8
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
9
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
10
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
11
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
12
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
13
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
14
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
15
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
16
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
17
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
18
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
19
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
20
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook

त्यांच्यासाठी रात्र हाच दिवस

By admin | Updated: October 17, 2016 01:30 IST

औद्योगिकनगरीत यंत्रांचा खडखडाट सायंकाळ होताच थांबतो.

पिंपरी : औद्योगिकनगरीत यंत्रांचा खडखडाट सायंकाळ होताच थांबतो. दिवसभराचे शासकीय व अन्य कार्यालयांचे व्यवहार ठप्प होतात. बाजारपेठेतील दुकानांचे शटर बंद होते. दिवसभर काबाडकष्ट करून थकलेला श्रमिकवर्ग रात्री घरात विश्रांती घेत असतो. अंधार पडून रस्त्यावरील वर्दळ कमी होते. सर्व शहर निद्रिस्त अवस्थेत जाते; त्याच वेळी जगण्याची धडपड करणाऱ्या अनेकांचा रात्रीच्या अंधारातच दिवस सुरू होतो. कोणत्याही रिक्षा संघटनेचा सदस्य नसल्याने दिवसभर शहरातील कोणत्याही रिक्षातळावर थांबू दिले जात नाही. त्या रिक्षातळाजवळून प्रवासी घेता येत नाही. व्यवसाय तरी कसा करायचा? आठ तासांच्या शिफ्टवर घेतलेल्या रिक्षाचे ठरलेले भाडे रिक्षामालकाला द्यावेच लागणार अशी परिस्थिती असल्याने काही रिक्षाचालकांना अक्षरश: रात्रीचा दिवस करावा लागतो. एक पदवीधर तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. गोविंदा त्याचे नाव. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. अशाच खडतर परिस्थितीत कसेबसे शिक्षण केले. नोकरी मिळाली नाही. रिक्षा व्यवसायानेच आधार दिला. परमिट नाही. त्यामुळे स्वत:ची रिक्षा घेता येत नाही. ५०० रुपये आठ तासांची शिफ्ट याप्रमाणे रिक्षामालकाला पैसे द्यावे लागतात. उर्वरित रक्कम स्वत:साठी ठेवायची, असा हा त्याचा नित्यक्रम आहे. रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून एसटी आणि रेल्वेने आलेले प्रवासी घेऊन जायचे. वाहन मिळत नाही, म्हणून रात्री बसथांब्यावर, रेल्वे स्थानकाजवळ थांबलेले, अडचणीत असलेले हेच रात्रीच्या वेळी अशा रिक्षाचालकांचे ग्राहक असतात, असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)>गर्दुले, पाकीटमार, भिकाऱ्यांचा सहवासलोणावळा आणि परिसरात भाजीविक्री करणारे अनेक जण रात्री शेवटच्या लोणावळा-पुणे लोकलने पुण्यात भाजी खरेदीसाठी जातात. गुलटेकडी येथे भाजी खरेदी करून पहाटे पुन्हा लोणावळ्याकडे निघतात. पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या या भाजीविक्रेत्यांना नाईलाजास्तव शेवटच्या लोकलला गर्दुले, पाकीटमार आणि भिकारी यांचा सहवास मिळतो. रात्रीचे शहर अनुभवण्यासाठी बाहेर पडल्यानंतर रात्रीचा दिवस करून जगण्याचा संघर्ष करणारे असे अनेकजण दृष्टिपथास येतात.