शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृह

By admin | Updated: September 10, 2016 01:43 IST

लोकवस्त्यांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांत महिला आणि पुरुष असेच वर्गीकरण केलेले असते.

मुंबई : लोकवस्त्यांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांत महिला आणि पुरुष असेच वर्गीकरण केलेले असते. पण तृतीयपंथीयांसाठी वेगळे स्वच्छतागृह, शौचकूप नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत नैसर्गिक विधीसाठी थांबावे लागते. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ही परिस्थिती बदललेली नाही. पण, मुंबईतील बैंगनवाडी परिसरात ‘एकता हिंद मंडळा’ने हा बदल घडवला आहे. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांसाठी राखीव शौचकूप ठेवण्यात आले आहे. महिला आणि पुरुषांप्रमाणेच सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष व्यवस्था असायला हवी, असे निर्देश न्यायालयाने २०१५मध्ये दिले होते. तरीही तृतीयपंथीयांची वस्तीपातळीवर संख्या कमी असल्याने याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. काही दिवसांपूर्वीच ‘राईट टू पी’ची राष्ट्रीय परिषद मुंबईत पार पडली. या वेळी छत्तीसगड येथून आलेल्या तृतीयपंथीयांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची व्यथा मांडली होती. रात्री अंधार पडेपर्यंत आम्हाला थांबून राहावे लागते. कारण, महिलांच्या स्वच्छतागृहात गेल्यावर त्यांना ही गोष्ट आवडत नाही. तर, पुरुषांच्या स्वच्छतागृहात आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे आमची कुचंबणा होते. या परिषदेत पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आला होता. मुंबईतील तृतीयपंथीयांनाही ही समस्या भेडसावते. त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. म्हणून पुढाकार घेऊन गोवंडीच्या बैंगनवाडी येथील दस्वच्छतागृहात तृतीयपंथीयांसाठी राखीव कूप ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेतून उभारलेले हे स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहात ‘तृतीयपंथीयांसाठी राखीव’ असा फलक दिसल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरातील तृतीयपंथीयांसाठीचे हे पहिले स्वच्छतागृह आहे. बैंगनवाडी, कुर्ला आणि देवनार परिसरात अनेक ठिकाणी तृतीयपंथीयांच्या वस्त्या आहेत. (प्रतिनिधी)