शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर पाठविल्यामुळे ठाणेदार अडचणीत

By admin | Updated: November 14, 2015 02:18 IST

भाजप पदाधिका-यांची कारवाई करण्याची मागणी

मालेगाव (जि. वाशिम): ठाणेदार मिर्झा यांनी पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडीयावर दुसर्‍यांना पाठवून पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केल्यामुळे ठाणेदार अडचणीत सापडले आहेत. मालेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक के.आय.मिर्झा यांनी सोशल मिडीयावर १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत अपमानास्पद वक्तव्याची व्हीडीओ पोस्ट व्हॉटस अपवर अन्य गृपवर पाठविली. याबाबत भाजपाच्या काही पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांकडे तक्रार केली. तसेच त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. भाजपाचे तालुका सरचिटणीस मोहन बळी यांनी यावर जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेशी संपर्क साधून सदर वादग्रस्त ध्वनीचित्रण निदर्शनास आणून दिली. यावर पोलिस उपविभागीय अधिकारी मेघराजन यांनी तात्काळ दखल घेणार असल्याचे आश्‍वासन बळी यांना दिले. ठाणेदारांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांंंचेच लक्ष वेधले आहे. सदर ध्वनीचित्रफित पालकमंत्री, खासदार, तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींना संपर्क साधून पाठविण्यात आली आहे.