शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत पुन्हा खड्ड्यांत हरवले ठाणे

By admin | Updated: September 22, 2016 03:33 IST

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील खड्ड्यांना काही प्रमाणात मुलामा लावला गेला असला तरी तो पुन्हा उडाला

ठाणे : मॅरेथॉनच्या मुहूर्तावर, त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात शहरातील खड्ड्यांना काही प्रमाणात मुलामा लावला गेला असला तरी तो पुन्हा उडाला असून दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने शहराच्या विविध भागांत पुन्हा खड्डेच खड्डे असे चित्र दिसत आहे. पालिकेच्या कागदावर मात्र शहरात आजघडीला अवघे २०३ खड्डे असले तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचे चित्र आहे. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने यंदा जेट पॅचर ही यंत्रणादेखील वापरली. परंतु, ती सपशेल फोल ठरली आहे. त्यात आता पावसाने पुन्हा एकदा आपला रंग दाखवल्याने शहरात पुन्हा खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरातील अनेक भागांत अरु ंद रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली होती. ती भेदण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम शहरात राबवली. या मोहिमेत रस्त्यांचे रु ंदीकरण करण्याबरोबरच काही रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांसाठी कोट्यवधी रु पये खर्च करण्यात आले. असे असतानाच ऐन गणेशोत्सवात त्यापैकी काही रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यामुळे महापालिका प्रशासन टीकेचे धनी ठरले होते. गणेशोत्सवाच्या आधी पालिकेची ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धा होणार होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. त्यामध्ये शहरातील विविध मार्गांवरील खड्डे बुजवले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास सुरू होता. असे असतानाच गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढला असून या पावसामुळे शहरातील विविध मार्गांवर ते पुन्हा पडल्याचे चित्र आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील उड्डाणपुलांवरही ते पडल्याचे दिसून येते. घोडबंदर भागात नव्याने तयार केलेल्या सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली असून मानपाडा भागात सेवा रस्ते अक्षरश: उखडले आहेत. त्याचप्रमाणे ठाणे, वागळे, कळवा आणि मुंब्रा भागांतील अंतर्गत रस्त्यांवरही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. अपघात होऊ नये, म्हणून चालक वाहने सावकाश चालवत आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कोंडी होऊ लागली आहे. पालिकेने आजघडीला केवळ २०३ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असल्याचा दावा केला आहे. परंतु, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. >शहरात एकूण २९४१ खड्डे असून त्याचे क्षेत्रफळ ७ हजार ७३ एवढे आहे. यातील २७३९ खड्डे बुजवले असून त्याचे क्षेत्रफळ ६ हजार ७१२ एवढे असून आता केवळ २०४ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असून त्याचे क्षेत्रफळ केवळ ३५३ एवढे असल्याचा दावा करण्यात आला आहे.