शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात निवासी डॉक्टरला मारहाण

By admin | Updated: March 30, 2017 04:07 IST

ठाणे जिल्हा (सिव्हिल) शासकीय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर जावेद शेख यांना, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी बुधवारी

 ठाणे : ठाणे जिल्हा (सिव्हिल) शासकीय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर जावेद शेख यांना, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी बुधवारी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत शेख जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने अपघात विभागात तोडफोड केली आणि तेथील शिकाऊ डॉक्टरांना शिवीगाळ करत ‘बघून घेऊ’ अशी धमकी दिली. मारहाणीच्या निषेधार्थ शिकाऊ डॉक्टरांनी ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा दिला असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सी.बी. केम्पीपाटील यांनी रुग्णालय सुरू असल्याचे स्पष्ट केले. मारहाणप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून, गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.बुधवारी दुपारी महागिरीतील मेमन याच्या हाताला जखम झाल्याने त्याला रुग्णालयात आणले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना, सलाइन लावण्यावरून रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी शिकाऊ डॉक्टर शेख यांच्याशी हुज्जत घातली. इतकेच नव्हे, तर मेमन आणि  त्याच्या नातेवाइकांनी शेख यांना मारहाण केली, अन्य डॉक्टर  दिबानाज अन्सारी हिच्या अंगावर रुग्णाचे नातेवाईक धावून गेले. अपघात विभागातून जाताना त्यांनी दरवाजाची व काचांची तोडफोड केली. ही घटना घडली, तेव्हा ड्युटीवरील पोलीस हजर नसल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.  रुग्णाला घेऊन आलेला जमाव हा १५-२० जणांचा होता. रुग्णावर तत्काळ उपचार सुरू के ले  होते. रुग्णाला ज्या ठिकाणी जखम झाली होती, तेथेच सलाइन लावल्याचा आग्रह नातलगांनी केला. मात्र, त्याला शेख यांनी विरोध केल्याने नातेवाईक संप्तत झाले. त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)रुग्णाच्या हाताला धारदार शस्त्राने जखम झाली होती, तरीसुद्धा त्याचे पेपर तयार करण्यात वेळ न दवडता, तत्काळ उपचार सुरू केले होते. घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा दिला असला, तरी रुग्णालय बंद राहणार नाही.- डॉ. सी. बी. केम्पीपाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणेज्या भागात मारहाण झाली, तेथे सीसीटीव्ही नाहीत. मात्र, रुग्णालयात इतर ठिकाणी असलेल्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांची पाहणी केली असून, त्यामध्ये पोलीस रुग्णालय परिसरात असल्याचे दिसतात, तसेच १०-१५ जणांचा जमाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे. - अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर