शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचे पोलीस हवालदार राज्यातून अकरावे

By admin | Updated: May 26, 2017 04:24 IST

कळवा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले कुणाल गांगुर्डे महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळवा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले कुणाल गांगुर्डे महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रातून अकरावे तर ठाण्यातून प्रथम आले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या कुणाल यांचे केवळ ठाण्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. कुणाल यांचे वडील धर्मा गांगुर्डे सहाय्यक उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झाले आहेत. कुणाल यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. परंतु पोलीस खात्याची त्यांना आवड असल्याने वडिलांकडून प्रेरणा घेऊन ते या सेवाक्षेत्रात आले. गेली दहावर्षे ते पोलीस खात्यात असून, सध्या कळवा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मुलाने आणखीन मोठ्या पदावर असावे, असे स्वप्न त्यांच्या वडिलांनी बाळगले होते. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करीत पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी सहा महिने सुट्टी घेऊन दिवसातील १६ तास अभ्यास केला. सकाळ - संध्याकाळ तीन तास ते मैदानावर सराव करीत तर उर्वरित वेळ लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करीत. या आधी त्यांनी दोन ते तीन वेळा ही परीक्षा दिली होती. परंतु त्यांना यश आले नाही. यावेळेस त्यांनी उत्तीर्ण होण्याचे मनावर घेतले आणि महाराष्ट्रातून अकरावे तर ठाण्यातून प्रथम आले.