शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिका आयुक्तांचा कारवाईचा हातोडा

By admin | Updated: May 12, 2017 03:00 IST

ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर आक्रमक झालेले पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरूवारी संध्याकाळी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर आक्रमक झालेले पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरूवारी संध्याकाळी त्या भागातील गाळे तोडून आपल्या आक्रमकतेचे प्रत्यंतर दिले. नंतरही पुढे जाऊन त्यांनी स्टेशन परिसरात बेशिस्तपणे उभ्या असलेल्या रिक्षाचालक आणि बाईकस्वारांनाही कारवाईचा प्रसाद दिला. आयुक्तांनी कॉलर धरल्याचा आणि त्यांच्या रक्षकांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करून नंतर रिक्षाचालकांनी बंद पाळला. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरूवारी सायंकाळी गाळेधारकांवर कारवाई केली. उपायुक्त माळवी यांना ज्या परिसरात बुधवारी रात्री मारहाण झाली होती, त्या ठिकाणी पालिकेच्या पथकाने जाऊन आधी गाळ््यांना सील ठोकले. तोवर सर्व गाळे पटापट बंद झाले होते. मात्र ज्या गाळेधारकाच्या गल्ल्यावरून माळवी यांची चकमक उडाली, तो वगळता अन्य गाळ््यांचे सील नंतर अधिकाऱ्यांनी काढले. नंतर तेथे आलेले जयस्वाल यांनी मात्र सर्व गाळे तोडण्याचे आदेश दिले. आम्हाला त्याची पूर्वकल्पनाही दिली नाही आणि आतील वस्तू बाहेर काढण्याची संधी दिली नाही, असा गाळेधारकांचा आरोप होता.