शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मनसे, बसपाला धक्का

By admin | Updated: September 20, 2016 04:43 IST

गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये इनकमिंग सुरू असतानाच आता शिवसेनेतही इनकमिंग सुरू होणार आहे.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये इनकमिंग सुरू असतानाच आता शिवसेनेतही इनकमिंग सुरू होणार आहे. मनसेच्या ३९-अ च्या नगरसेविका रुचिता मोरे आणि परिवहन समितीचे सदस्य राजेश मोरे हे मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता मनसेला आणखी एक धक्का बसणार आहे. याशिवाय बीएसीपीचे परिवहन सभापती दशरथ यादव आणि त्यांच्या आई नगरसेविका सुशीला यादव याही उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे.काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी अलीकडेच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेनेदेखील इतर पक्षातील मंडळींना आपल्याकडे खेचण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेचे परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आणि त्यांची पत्नी रुचिता मोरे (नगरसेविका) या मंगळवारी शिवसेनेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. यापूर्वी दिव्यातील नगरसेवक शैलेश पाटील आणि संगीता मुंढे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, तर सुधाकर चव्हाण यांच्यावर पक्षादेश डावलल्याने कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मनसेचे आता ७ पैकी ४ नगरसेवकच शिल्लक राहिले आहेत. तसेच काँग्रेसच्या कोपरीतील नगरसेविका मालती पाटील, त्यांचे पती रमाकांत पाटील हेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (प्रतिनिधी)>कोणत्याही प्रकारच्या चर्चेत सहभागी केले जात नाही तसेच कोणतीही सूचना न देता पदावरून दूर केले आहे. त्यामुळेच अखेर कंटाळून हा निर्णय घेतला आहे.- राजेश मोरे, परिवहन समिती सदस्य, मनसे