शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

ठाण्यातील काँग्रेसला गळतीची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 02:41 IST

संजय घाडीगावकर यांनी अपक्ष नगरसेविकेसह भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

ठाणे : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी अपक्ष नगरसेविकेसह भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाच्या प्रभाग क्र. ४७ अ च्या नगरसेविका मेघना हंडोरे यांनीदेखील आपल्या पतीसमवेत भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे ठाण्यात आता मोठ्या प्रमाणात पक्षाला गळती लागली असून त्यांच्या प्रस्थापित नगरसेवकांची संख्या घटू लागली आहे.मेघना हंडोरे यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी आमदार संजय केळकर, संजय घाडीगावकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच घाडीगावकर यांनी काँग्रेसवर टीका करून पक्ष सोडला होता. त्यानंतर, आता हंडोरे यांनीदेखील पक्षाला अखेर हात दाखवला आहे. ही गळती आजपासूनची नसून काँग्रेस वाढण्याऐवजी कमीकमी होत आहे. फाटक दाम्पत्याने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून ती जिंकलीदेखील. परंतु, काहींनी आपल्यावर कारवाई होऊ नये, त्यामुळे पक्षात राहून शिवसेनेशी संधान साधले आहे. त्यात आता पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसने मनोज शिंदे यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी सर्वांना सामावून घेण्यासाठी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. परंतु, या कार्यकारिणीवर आक्षेप घेऊन अनेक निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी पक्षाचे वरिष्ठ नेते ठाण्यात आले असता, येथील निष्ठावान नगरसेवक नारायण पवार यांनी थेट पक्षातील श्रेष्ठींवरच तोफ डागली. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यात आता नगरसेवकांचे इतर पक्षांत आउटगोइंग सुरू झाल्याने काँग्रेससमोर गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करण्याऐवजी भाजपात प्रवेशासाठी चुरस आहे.२०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला रवींद्र फाटक यांनी जोरदार धक्का देऊन पत्नी जयश्री फाटकसह दीपक वेतकर, राजा गवारी, मीनल संख्ये, कांचन चिंदरकर, मनजित कौर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.