शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील निवडणूक ठरणार अटीतटीची

By admin | Updated: May 18, 2016 05:23 IST

ठाणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधान परिषदेत निवडून जाणाऱ्या वसंत डावखरे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरविले

ठाणे : मागील चार टर्म ठाणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधान परिषदेत निवडून जाणाऱ्या वसंत डावखरे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरविले आहेत. विधिमंडळात जाण्यासाठी तीन वेळा प्रयत्न करूनही अपयश मिळालेल्या फाटक यांच्याकडून चौथ्यांदा जोरदार प्रयत्न होणार असल्याने, ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. या निवडणुकीसाठी सेनेकडून कल्याण-डोंबिवली पालिकेचे सभागृहनेते राजेश मोरे यांनी डमी अर्ज भरला आहे. अर्ज छाननीतील धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून हा डमी अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले.या पूर्वी १९९२ आणि ११९८ मध्ये डावखरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली आहे. त्यानंतर, २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी आव्हान दिले होते. २०१० मध्ये शिवसेनेने रमेश म्हात्रे यांना संधी दिली होती, परंतु ऐन वेळेस शिवसेनेने म्हात्रे यांना माघार घेण्यास भाग पाडल्याने डावखरे बिनविरोध निवडून आले होते. २००४ मध्ये रवींद्र फाटक यांना डावखरे यांनी पराभूत केले होते. त्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या फाटक यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर कोकणातून निवडणूक लढविली होती, तर २०१४ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीवर ठाण्यातून निवडणूक लढविली होती. या प्रत्येक वेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता ते उट्टे काढण्यासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत. सध्याचे संख्याबळ पाहता, राष्ट्रवादीकडे १९९, काँग्रेसकडे १०३ आणि बहुजन विकास आघाडीकडे ११९ अशी ४२१ मते आपली हक्काची असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे, तर शिवसेना ३११, भाजपा १८० असे ४९१ मतांची जुळवणूक युतीची आहे, तर इतरांची ११९ मते असून ती निर्णायक ठरतील.ठाणे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज शेवटच्या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेने अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी फाटक यांच्या नावाची घोषणा करून, तासाभरात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.