शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'जयदेव' यांच्यामुळे ठाकरे बंधूंची जुळणार मनं ?

By admin | Updated: July 29, 2016 20:45 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच वर्षांनंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

ऑनलाइन लोकमतमुबंई, दि. 29 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच वर्षांनंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल सव्वा तास राज-उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांनी आगामी पालिका निवडणुकीत दोघे बंधू एकत्र येणार असल्याची आवई उठवली होती. मात्र राज आणि उद्धव यांच्या भेटीमागील खरं कारण लोकमतच्या सूत्रांकडून आम्हाला समजलं आहे.

राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीदरम्यान जयदेव ठाकरेंच्या मालमत्तेसाठीच्या न्यायालयीन लढाईवरच चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती लागली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अचानक भेटीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. जयदेव ठाकरेंच्या माध्यमातूनच राज आणि उद्धव यांची मनं पुन्हा जुळणार का?, असा विषय आता चर्चिला जाऊ लागला आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी जयदेव ठाकरे फक्त निमित्तमात्र आहेत. खरं तर या दोघांनीही एकत्र यावं असं उभ्या महाराष्ट्राला वाटतं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपच्या दबावतंत्रातली हवा आपोआपच निघून जाईल. काही दिवसांपूर्वीच्या भाजपाच्या भूमिकेवरून भाजप शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना जुमानत नसल्याचं समोर आलं आहे.

उद्धव ठाकरेंनी सत्तेतून बाहेर पडण्याचा भाजपला इशाराही दिला आहे. मनसेला सोबत घेतल्यास उद्धव ठाकरेंना भाजपला नामोहरम करणं सोपं जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतल्यास मुंबई महापालिकेवर भगव्याची जादू कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज-उद्धव ठाकरे येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.