शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून वरूड येथे तिहेरी हत्याकांड

By admin | Updated: January 25, 2015 00:56 IST

विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली. त्यानंतर आरोपीने थेट स्वत:च्या घरी जाऊन त्याच्या अनैतिक

तालुका हादरला : प्रेयसीसह दिरावर चाकूने वार, पित्यावर झाडली गोळीवरूड (अमरावती) : विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली. त्यानंतर आरोपीने थेट स्वत:च्या घरी जाऊन त्याच्या अनैतिक संबंधांवर सतत आक्षेप घेणाऱ्या स्वत:च्या पित्याचाही गावठी पिस्तूलने गोळी झाडून खून केला. ही घटना नजीकच्या बारगाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. अनैतिक संबंधातून घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने तालुका हादरला आहे.अंजिरा रामेश्वर उईके (२७), गोपाल बिरजू उईके (२२) व पंजाबसिंग भादा (५५) अशी या हत्याकांडातील मृतांची नावे आहेत. मनोजसिंग पंजाबसिंग भादा (२७) असे आरोपीचे नाव आहे. बारगाव येथे भादा व उईके कुटुंब शेजारी राहतात. मृत अंजिरा उईकेचा पती २०१२ पासून बेपत्ता असल्याने अंजिरा ही सागर (१०), अमित (८) व दीर गोपाल उईकेसह येथे राहत होती. आरोपी मनोजसिंहसोबत अंजिराचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मनोजसिंगचे वडील पंजाबसिंग यांना होता. त्यावरून मनोजसिंग व पंजाबसिंग या पिता-पुत्रांमध्ये सातत्याने खटके उडत होते. घटनेच्या दिवशी आरोपी मनोजसिंगने अंजिरा व तिचा दीर गोपाल यास सोबत बघितले होते. त्यामुळे त्याचा संताप अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अंजिराच्या घरात चाकू घेऊन प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या अंजिरा व गोपालवर चाकूने सपासप वार केले. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. एवढ्यावरच आरोपी मनोजसिंगचा संताप शमला नाही. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्याने अंजिराचा मृतदेह फरफटत बाहेर आणला. त्यानंतर तो थेट स्वत:च्या घरी गेला आणि डुकरे मारण्याच्या गावठी पिस्तूलने गोळी झाडून त्याने त्याचे वडील पंजाबसिंग भादा यांचाही खून केला. बंदुकीच्या आवाजाने भादा कुटुंबातील सदस्य खडबडून जागे झाले. आरोपी मनोजसिंगने तिघांचा खून केल्याची घटना कळताच बारगाव हादरले. किसनसिंग भादा यांनी बेनोडा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पहाटे १ च्या सुमारास घटनास्थळ गाठून मृतदेहांचा पंचनामा केला. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा रामासामी, ठाणेदार मुकुंद ठाकरे, उपनिरीक्षक संतोष बोयणे, निरंजन उकंडे, प्रकाश तिखिले, संजय गोरे, मोहन महाजन, संतुलाल उईके, सुदर्शन देशमुख, रवींद्र दातीर, नीलेश गडपायले, अशफाकभाई यांचा पोलीस पथकात समावेश होता. दोन वर्षांपूर्वी अंजिराचा पती रामेश्वर उईके बेपत्ता असल्याची तक्रार बेनोडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. आरोपी मनोजसिंग यानेच रामेश्वरला संपविल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)