शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक प्रगतीत राज्यात प्रचंड प्रादेशिक असमतोल

By admin | Updated: February 11, 2017 03:19 IST

राज्याचा शिक्षण विभाग देशात १८ व्या स्थानापर्यंत मागे असल्याचे तथ्य ‘असर’ अहवालाने उघड केले आहे. त्यातही शैक्षणिक प्रगतीमध्ये राज्यात प्रचंड प्रादेशिक असमतोल असल्याचे निष्पन्न झाले

अविनाश साबापुरे, यवतमाळराज्याचा शिक्षण विभाग देशात १८ व्या स्थानापर्यंत मागे असल्याचे तथ्य ‘असर’ अहवालाने उघड केले आहे. त्यातही शैक्षणिक प्रगतीमध्ये राज्यात प्रचंड प्रादेशिक असमतोल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे, कोकण विभागातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता ७० टक्क्यांच्या पुढे असून विदर्भात हेच प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही उणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने देशभरात सर्वेक्षण करून ‘असर’ अहवाल (अ‍ॅन्युअल स्टेट्स आॅफ एज्युकेशन रिपोर्ट) जाहीर केला आहे. १८ जानेवारीला हा अहवाल येताच शिक्षण खात्याच्या प्रधान सचिवांनी सर्वप्रथम विदर्भाचा दौरा केला. कारण एकीकडे देशपातळीवर महाराष्ट्राची शिक्षणविषयक कामगिरी सुमार असताना राज्यांतर्गत विदर्भातील जिल्ह्यांची गुणवत्ताही खूपच कमी आहे. अहवालानुसार विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात १८ व्या क्रमांकावर आहे. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिलीचा मजकूर वाचता येण्याची सरासरी ७२.५ आहे. राज्यांतर्गत विचार केल्यास पुणे विभागातील वाचनक्षम विद्यार्थ्यांची सरासरी ८३.३, तर अमरावती विभागात ही सरासरी अवघी ६५.७ आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचा मजकूर वाचता येण्याची सरासरी पुणे विभागात ८४.२, तर अमरावती व नागपूर विभागात केवळ ६७ आणि ६८ टक्के आहे. वाचन क्षमतेप्रमाणेच गणिताबाबतही राज्यात प्रादेशिक असमतोल आहे. अहवालानुसार, वजाबाकी करता येणाऱ्या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पुणे विभागात ५५.९ टक्के आहे. मात्र, अमरावती विभागात हे प्रमाण फक्त २९.९ टक्के आहे.नागपूर विभागही ३८ टक्क्यांतच समाधानी आहे. भागाकार करता येणाऱ्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खुद्द पुणे विभागातही ३८ टक्केच आहे. तर अमरावती व नागपूर विभाग येथेही २६ टक्क्यांवरच अडकले आहेत.