शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग प्रकल्प योजनेतील अटीं शिथिल

By admin | Updated: November 13, 2015 02:20 IST

वस्त्रोद्योगांना ऊजिर्तावस्था देण्यासाठी वस्त्रोद्योग प्रकल्प योजनेतील काही अटींना १0 नोव्हेंबरच्या शासन निर्णयाद्वारे शिथिलता.

नंदकिशोर नारे/ वाशिम: देशातील वस्त्रद्योग विकसित करण्यासाठी केंद्र शासनाकडून राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना मोठय़ा प्रमाणात अर्थसहाय्य मिळण्याची योजना आहे; मात्र या प्रक्रियेत अनेक प्रशासकीय अडचणी येतात. सहाजिकच वस्त्रोद्योग विकासाचा वेग मंदावला आहे. वस्त्रोद्योगांना ऊजिर्तावस्था देण्यासाठी वस्त्रोद्योग प्रकल्प योजनेतील काही अटींना १0 नोव्हेंबरच्या शासन निर्णयाद्वारे शिथिलता देण्यात आली आहे. वस्त्रोद्योग धोरण २0११-१७ अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यक समाजाच्या अस्तित्वातील यंत्रमाग घटकाच्या आधुनिकीकरणासाठी १0 टक्के भांडवली अनुदान देण्याच्या योजनेस २0१२ मध्ये मान्यता देण्यात आली होती. सदर धोरणांतर्गत दीर्घ मुदती कर्जाशी निगडित व्याज सवलत, विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारीकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांच्या प्रकल्पांना १0 टक्के भांडवली सवलत आणि अनुसूचित जाती- जमाती व अल्पसंख्यक समाजाच्या यंत्रमाग घटकांच्या आधुनिकीकरणांच्या प्रकल्पांना १0 टक्के भांडवली सवलत या प्रमुख योजनांचा समावेश आहे. सदर योजना केंद्र पुरस्कृत टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम्स (टीयूएफएस) शी संलग्न करण्यात आलेली असून राज्य योजनेंतर्गत लाभ प्राप्त करून घेण्यासाठी केंद्र पुरस्कृत (टीयूएफएस)अंतर्गत यूआयडी व केंद्र शासनाचे अर्थसहाय्य प्रत्यक्ष प्राप्त करून घेणो बंधनकारक आहे. टीयूएफएस संलग्न योजनेतील वस्त्रोद्योग प्रकल्पांना राज्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यास येणार्‍या प्रशासकीय अडचणी लक्षात घेता २१ फेब्रुवारी २0१४ रोजी अथवा त्यानंतर दीर्घ मुदती कर्ज मंजूर झालेल्या वस्त्रोद्योग प्रकल्पांना राज्य योजनेंतर्गत लाभास पात्र ठरण्याकरिता वस्त्र आयुक्त, भारत सरकार यांच्याकडून यूआयडी क्रमांक प्राप्त करून घेण्याची व केंद्र शासनाचे अर्थसहाय्य प्राप्त करण्याची अट शिथिल करण्यात आली होती. त्याच धर्तीवर १ एप्रिल २0११ ते २0 फेब्रुवारी २0१४ (व्याज अनुदान) व १ मार्च २0१२ ते २0 फेब्रुवारी २0१४ (भांडवली अनुदान) या कालावधीत टीयूएफएसच्या निकषानुसार दीर्घ मुदती कर्ज मंजूर झालेल्या टीयूएफएस संलग्न योजनेतील वस्त्रोद्योग प्रकल्पांना राज्य योजनेंतर्गत लाभास पात्र ठरण्याकरिता वस्त्र आयुक्त भारत सरकार यांच्याकडून यूआयडी क्रमांक प्राप्त करून घेण्याची व केंद्र शासनाचे अर्थसहाय्य प्राप्त करण्याची अट शिथिल करण्याचे शासनाचे विचाराधीन होते. अखेर शासनाने १0 नोव्हेंबर रोजी यूआयडी क्रमांक प्राप्त करून घेण्याची व केंद्र शासनाचे अर्थसहाय्य प्राप्त करण्याची अट शिथिल केली. वस्त्रोद्योग धोरणाचे उद्दिष्ट राज्याच्या आर्थिक संरचनेमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. वस्त्रोद्योग शेती व्यवसायानंतर महत्त्वाचा व्यवसाय आहे. शेती व्यवसायानंतर या उद्योगामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. राज्यातील कापड उद्योगात वाढ व्हावी, रोजगारामध्ये वाढ आणि कापूस उत्पादक क्षेत्रात प्राधान्याने दीर्घ मुदतीच्या आश्‍वासक विकासासाठी कापूस ते तयार वस्त्र निर्मितीच्या विविध स्तरावरील प्रक्रिया घटकांच्या उभारणीवर विशेष भर देणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.