शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील दिव्यांसाठी हवी निविदा

By admin | Updated: September 25, 2016 02:18 IST

भविष्यात रस्त्यांवर दिवे बसवताना महापालिका निविदा प्रक्रियेनेचे कंत्राट देईल, अशी हमी देण्याचे निर्देश शुक्रवारी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. मरिन लाईन्स ते नरिमन

मुंबई : भविष्यात रस्त्यांवर दिवे बसवताना महापालिका निविदा प्रक्रियेनेचे कंत्राट देईल, अशी हमी देण्याचे निर्देश शुक्रवारी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. मरिन लाईन्स ते नरिमन पॉर्इंट (क्वीन्स नेकलेस) रस्त्यांवरील पांढरे एलईडी बदलून प्रायोगिक तत्वावर पिवळे एलईडी बसवताना मुंबई महापालिकेने निविदा प्रक्रिया अवलंबली नसल्याचे एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेला वरील निर्देश दिले.क्वीन्स नेकलेसला पूर्वीची झळाळी प्राप्त व्हावी, यासाठी २०१५ मध्ये तत्कालीन मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी केवळ मरिन लाईन्स ते नरीमन पॉर्इंट या रस्त्यावर सोडियम व्हेपरचे दिवे वापरण्याची सूचना महापालिकेला केली होती. मात्र केंद्र सरकारने एलईडी दिवे लावण्यास प्राधान्य देण्याचे सूचना केल्याने व याप्रकरणाला भाजप विरुद्ध शिवसेना असे राजकीय वळण लागल्याने राज्य सरकारने सोडियम व्हेपरचे दिवे लावणे शक्य नसल्याचे मुख्य न्यायाधीशांना सांगितले. मात्र यावर तोडगा म्हणून व क्वीन्स नेकलेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पांढऱ्या एलईडीऐवजी प्रायोगिक तत्वावर पिवळे एलईडी लावण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारने व महापालिकेने तत्कालीन मुख्य न्यायाधीशांना दिले.त्यानुसार महापालिकेने प्रायोगिक तत्वावर पिवळे एलईडी लावण्याचे काम एका कंत्राटदाराला दिले. मात्र त्यापूर्वी निविदा काढण्यात आल्या नाहीत. महापालिका संपूर्ण शहरात पिवळे एलईडी बसवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे अशाचप्रकारे निविदा प्रक्रियेचा अवलंब न करता कंत्राट दिले जाईल, अशी भीती विनायक निकम यांनी जनहित याचिकेद्वारे व्यक्त केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. मरिन लाईन्स ते नरिमन पॉर्इंट या रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर पिवळे एलईडी लावण्यात आले आहेत. त्यासाठी निविदा काढण्याची आवश्यकता नाही. यापुढे महापालिकेला निविदा काढाव्याच लागतील, असा युक्तिवाद कंत्राटदाराच्या वतीने ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी केला. तीन लाखापेक्षा अधिक रकमेचे कंत्राट द्यायचे असल्यास निविदा काढणे बंधनकारक आहे. मरिन लाईन्स ते नरिमन पॉर्इंट रस्त्यावरील दिवे प्रायोगिक तत्वावर बदलण्यात आले असतील आणि यापुढे महापालिका अशा प्रकारे निविदा न काढताच कंत्राट देणार नाही, अशी हमी देणार असेल तर याचिका मागे घेण्यास तयार आहोत, असे निकम यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने यापुढे शहरातील रस्त्यांवरील दिवे बदलण्याचे कंत्राट निविदा प्रक्रियेद्वारे देण्यात येईल, अशी हमी देण्याचे निर्देश महापालिकेला दिले. (प्रतिनिधी)