शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: January 14, 2016 02:38 IST

राज्य पोलीस दलातील तिघा विशेष महानिरीक्षकासह १० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर पंधरवड्यापूर्वी बढती मिळालेल्या राज्यातील १२३ साहाय्यक आयुक्त/

मुंबई : राज्य पोलीस दलातील तिघा विशेष महानिरीक्षकासह १० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर पंधरवड्यापूर्वी बढती मिळालेल्या राज्यातील १२३ साहाय्यक आयुक्त/ उपाधीक्षकांना पोस्टिंग दिले आहे. गृह विभागाने मंगळवारी रात्री त्याबाबतचे आदेश काढले. दोघा अधिकाऱ्यांशिवाय गुन्हे अन्वेषण विभागातील दत्तात्रय मंडलिक यांची अमरावती आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर तेथील राजकुमार व्हटकर यांची नागरी हक्क व संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या अधीक्षक आरती सिंग यांची नागपूर सीआयडीला तर परभणीतील अपर अधीक्षक अमोक जीवनगावकर यांची जालन्याच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पीसीआरचे अधीक्षक सुनील भारद्वाज यांची ठाण्याच्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. विवेक मासर व अमित काळे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीडचे अपर अधीक्षक कालिदास सूर्यवंशी यांची लातूर पोलीस केंद्रात बदली केली आहे. ३१ डिसेंबरला बढती दिलेल्या १२३ साहाय्यक अधीक्षक/ उपाधीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईतील ४१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) आशुतोष डुंबरे यांनी स्वीकारला पदभारबदली झालेल्यांमध्ये ठाण्यातील अपर पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांचा समावेश आहे. आशुतोष डुंबरे यांनी त्यांच्याकडून पदभार स्वीकारला. लक्ष्मीनारायण यांची पोलीस मुख्यालयात प्रशासन विभागात बदली झाली.