शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

दहा टक्के कॉल्स खरी माहिती देणारे

By admin | Updated: January 5, 2015 06:31 IST

पोलिसांच्या हेल्पलाइनचा फोन खणखणतो़़़ कोणीतरी अडचणीत असल्याने हा अ‍ॅलर्ट आहे, याच भावनेने पोलीस फोन उचलतात.

मुंबई : पोलिसांच्या हेल्पलाइनचा फोन खणखणतो़़़ कोणीतरी अडचणीत असल्याने हा अ‍ॅलर्ट आहे, याच भावनेने पोलीस फोन उचलतात. पण समोरून हॅलो... हॅलो़़़ इतकाच आवाज येतो आणि बहुतांश फोन हे अवघ्या ० ते ९ सेकंदांत कट होतात. दिवसभरात येणाऱ्या ५० टक्के कॉल्सच्या बाबतीत हेच घडताना दिसते. १०० आणि १०३ या हेल्पलाइन क्रमांकांवर येणाऱ्या कॉल्सपैकी फक्त १० टक्केच खरे असतात, अशी माहिती पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली.पोलिसांची तत्काळ मदत मिळावी, यासाठी १०० हा हेल्पलाइन क्रमांक आहे. १०३ हा क्रमांक लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या छळासंदर्भातील माहिती, मदत देण्यासाठी आहे. या हेल्पलाइनवर कॉल आल्यावर पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीकडून सर्व माहिती घेतात आणि त्या भागात पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांच्या टीमला ती माहिती दिली जाते. प्रत्यक्षात दिवसभरात येणाऱ्या कॉल्सपैकी १,१०० ते १,५०० कॉल्सना खऱ्या मदतीची गरज असल्याचे दिसून आले आहे. १०० आणि १०३ या हेल्पलाइनवर येणारे ४० टक्के कॉल्स हे वेगवेगळी माहिती विचारण्यासाठी केले जातात. काही वेळा बेस्ट बसेसचीही चौकशी केली जाते. विमा योजनांविषयीही विचारले जाते़ एखाद्या ठिकाणी कसे पोहोचायचे, असे प्रश्नही विचारले जातात. तर अनेकदा ज्येष्ठ नागरिक १०३ या क्रमांकावर कॉल्स करून बोलतात़ नंतर थोड्या वेळाने फोन ठेवतो, असे सांगतात. फोन का केला, असे विचारल्यास बोलायला कोणी नाही म्हणून फोन केला, असे सांगितले जाते. पण ज्यासाठी हेल्पलाइन आहे त्यासाठी येणारे कॉल्स खूपच कमी असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)