शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखांचे मिथेड्रीन जप्त

By admin | Updated: March 23, 2017 02:52 IST

पालघर-बोईसर रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील रेनबो पेंट अँड रेझिन या कंपनीवर मुंबईच्या महसूल गुप्तचर संचनालायाने धाड

हितेन नाईक / पालघरपालघर-बोईसर रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील रेनबो पेंट अँड रेझिन या कंपनीवर मुंबईच्या महसूल गुप्तचर संचनालायाने धाड टाकून दहा लाखाचे मिथेड्रीन जप्त केले. तसेच कंपनीच्या मालकासह ४ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एका अभिनेत्रीचाही संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पालघर तालुका औद्योगिक वसाहतीमध्ये पेंट बनवणारी ही कंपनी पालघरच्या रघुवीर पाटील यांची असून त्याने काही महिन्यांपूर्वी आपल्या कंपनीतील काही भाग भाडे तत्वावर भानुदास मोरेला वापरण्यास दिला होता. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चर्चगेट येथील महसूल गुप्तचर संचलनालयाच्या युनिटने अचानक धाड घातली. त्यावेळी काही लोक मिथेड्रीन बनवित असल्याचे निदर्शनास आले. ते द्रव रूपात असल्याने त्याची पावडर बनविण्याची प्रक्रि या सुरु असतानाच धाड घालून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील प्रमुख आरोपीला गुप्तचर संचालनालयाने काही वर्षापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे युनिट त्याच्या पाळतीवर होते. पालघर च्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहा. पो. नि. दीपक साळुंखे स्थानिक गुन्हे शाखेचे व्हनमाने यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या परिसरात अशा घटना सातत्याने घडत आहेत. एकांतवास असणाऱ्या मोक्याच्या जागा हेरून देशद्रोही कारवाया पालघर जिल्ह्यात होत असून या कारवायांची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.