शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

टेमघर डिसेंबर पर्यंत रिकामे करणार

By admin | Updated: August 22, 2016 20:34 IST

टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी या धरणाचे काम तातडीने घेण्यात येणार आहे. मात्र, खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने टेमघर धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडणे शक्य नसल्याने

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २२ : टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी या धरणाचे काम तातडीने घेण्यात येणार आहे. मात्र, खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने टेमघर धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडणे शक्य नसल्याने हे धरण डिसेंबर पर्यंत हे धरण दूरूस्तीसाठी रिकामे करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. या धरणाची क्षमता ३.८१ टीएमसी असून सध्या धरणात ९० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे गळती रोखण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा कमी केला जाणार असून तो २.३१ ते २.८१ इतका पाणी साठा शिल्लक ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टेमघर धरणातून तब्बल ६०० लिटर पाण्याची प्रतिसेकंद गळती होत आहे. सेकंदांचा हिशोब मांडला तर ते फारसे काही विशेष वाटत नाही. ही गळती दिवसांमध्ये मोजल्यास एका दिवसाचे ८६,४०० सेकंद म्हणजे दिवसाला ५,१८,४०,००० याचा अर्थ दिवसाला पाच कोटी अठरा लाख चाळीस हजार लिटर पाण्याची गळती होते. एका महिन्याचा हिशेब मांडला तर एकशे पंचावन्न कोटी बावन्न लाख लिटर पाण्याची गळती होत आहे.पुण्यात प्रती व्यक्ती प्रती दिन १४० लिटर पाणी दिले जाते ( किमान तसे म्हटले जाते) हाच हिशेब मांडला तर दिवसाला ३,७०,२८५ ( तीन लाख सत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी ) लोकांना पुरेले एवढे पाणी वाया जात आहे.

तर या गळतीमुळे धरणाला धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून तातडीने या धरणाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या धरणांमध्ये आज अखेर ९० टक्के पाणीसाठा आहे. तसेच हे पाणी सध्या सोडल्यास ते खडकवासला धरणातून नदीत सोडावे लागेल. त्यामुळे पाणी नदीत न सोडता सोडावे लागणारे पाणी पुणे शहर तसेच कालव्याद्वारे सिंचनासाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आधी खडकवासला धरणातील पाणी पुणे शहर तसेच सिंचनासाठी सोडून नंतर टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबर मध्ये धरणाचे दुरूस्तीचे काम करण्याचे काम नियोजन असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.