शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार, बीडीओंसह १३ जणांची चौकशी

By admin | Updated: October 22, 2016 23:44 IST

गंगापूर तालुक्यातील सव्वाकोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी एम. एन. वाघ यांच्यासह १३ जणांची

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील सव्वाकोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी एम. एन. वाघ यांच्यासह १३ जणांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. सदोष अनुदान वाटपाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि सहकार खात्याच्या सहायक निबंधकांवरही ठपका ठेवण्यात आला आहे.अनुदान वाटपासाठी बनावट शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्याप्रकरणी अव्वल कारकून के. के. जेठे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुष्काळी अनुदानापासून अनेक गरजू शेतकरी वंचित असताना, गंगापूर तालुक्यात २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात लाभार्थ्यांच्या बनावट याद्या तयार करून सव्वाकोटी रुपयांचे अनुदान लाटण्यात आले होते. ‘लोकमत’ने जुलै महिन्यात वृत्तमालिकेद्वारे हा घोटाळा चव्हाट्यावर आणला होता. ‘लोकमत’च्या बातम्यांची दखल घेऊन, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी लेखाधिकाऱ्यांच्या विशेष पथकांमार्फत अनुदान वाटपाची चौकशी केली होती.अनुदान घोटाळ्याप्रकरणी गवळी शिवराचे तलाठी आय. के. सोनवणे, व्ही. के. कंसार, शिरेसायगावचे तलाठी ज्ञानेश्वर नजन यांना या पूर्वीच निलंबित करण्यात आले होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अव्वल कारकून के. के. जेठे यांची सोयगाव येथे तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आता त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्हा बँक आणि तहसील कार्यालयातील निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता १० वर पोहोचली आहे. (प्रतिनिधी)सर्व तालुक्यांची तपासणी- अनुदान वाटपात झालेल्या गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. इतरही तालुक्यांत शेतकरी नसणाऱ्यांना अनुदान दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लेखाधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून, सर्वच तालुक्यांतील अनुदान वाटपाची तपासणी केली जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले.