शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षण पंधरवडा

By admin | Updated: December 31, 2016 02:56 IST

प्रत्येक मुलास समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास निरक्षरता कमी होऊन प्रगती होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राज्यातील शाळांमध्ये ३ ते २६

मुंबई : प्रत्येक मुलास समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास निरक्षरता कमी होऊन प्रगती होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राज्यातील शाळांमध्ये ३ ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे. बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे प्रत्येक शाळेत पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी आणि राज्यातील एकही मुलगी शाळेपासून वंचित राहू नये यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. मुलीच्या शिक्षणावर कमी खर्च केला जातो. त्यामुळे अनेकदा मुलींना अर्धवट शाळा सोडावी लागते. असे घडू नये म्हणून मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी पंधरवड्यात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून जनजागृती करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. त्याचबरोबर परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये म्हणून उपक्रम राबविला जाणार आहे. मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, वैचारिक आणि तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून विद्यार्थिनींची होणारी गळती कमी करण्यासाठीही हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)