शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची रिक्त पदे भरलीच पाहिजेत

By admin | Updated: July 1, 2014 00:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबतच राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांत महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्त पदे ही मोठी समस्या बनली आहे. यासंदर्भात राज्य शासनाने

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबतच राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांत महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्त पदे ही मोठी समस्या बनली आहे. यासंदर्भात राज्य शासनाने कठोर पावले उचलण्याचे ठरविले आहे. अनुदानित महाविद्यालयांतील सर्व रिक्त पदे सहा महिन्यांच्या आत भरलीच पाहिजेत, असे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. त्यानुसार नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली असून, या निर्देशांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारादेखील दिला आहे.गुणात्मक महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षणात सुधारणा करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला उच्चशिक्षण व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव, उपसचिव, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिव यांची उपस्थिती होती. या आढावा बैठकीत राज्यातील उच्चशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यात महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षकांची कमतरता, सोयीसुविधांचा अभाव इत्यादी मुद्यांवर सखोल विचारदेखील झाला.विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकांच्या सर्व रिक्त जागांवर शिक्षकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यांच्या आत राबविण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले होते. या निर्देशांच्या आधारावर विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’ संचालक (बोर्ड आॅफ कॉलेज अ‍ॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट) डॉ. श्रीकांत कोमावार यांनी नागपूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व अनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहिले आहे. महाविद्यालयांना या निर्देशांचे पालन करणे आवश्यकच आहे. जर असे झाले नाही तर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)