शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात शिक्षक संघटनांचा हल्लाबोल

By admin | Updated: December 8, 2014 03:02 IST

शैक्षणिक वर्ष २०१३-१४ च्या शाळांच्या कर्मचारी संच निर्धारणावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देऊनही

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०१३-१४ च्या शाळांच्या कर्मचारी संच निर्धारणावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देऊनही राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवित आहेत. याच्या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर येथे शिक्षक संघटनांच्या वतीने हल्लाबोल करण्यात येणार आहे.संच निर्धारणामुळे राज्यात हजारोंच्या संखेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. तसेच तीन वर्षे सेवा कालावधी पूर्ण न झालेल्या शेकडो शिक्षणसेवकांना सेवामुक्त्त व्हावे लागत आहे. शासनाच्या या शिक्षक व शिक्षण हितविरोधी कृतीला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व अन्य संघटनांसह उच्च न्यायालयात शिक्षक आमदार नागो गाणार यांनी आव्हान दिले. या याचिकेवर उच्च न्यायालयाने शासनाच्या या कृतीला स्थगिती दिली. मात्र शिक्षणाधिकारी याचा चुकीचा अर्थ काढून शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या आमदारांच्या बैठकीत आंदोलनकर्त्यांनी बाजू मांडत शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कालबाह्य संच निर्धारणानुसार कारवाई करणे नियमबाह्य असल्याचे विषद केले. संच मान्यतेमध्ये उणिवा असल्यामुळे शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणे, शिक्षणसेवकांची सेवा समाप्त करणे बंद करावे, अशी मागणी केली. यावर शिक्षणमंत्र्यांनी एकाही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. परंतु दुसरीकडे शिक्षणाधिकारी नियमबाह्य पद्धतीने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्याचे आदेश देत असल्याने राज्यभर सावळागोंधळ सुरू आहे. या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शक्षक संघटनांच्यावतीने हल्लाबोल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)