शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बदलापूरमध्ये टीडीआर घोटाळा

By admin | Updated: August 21, 2015 01:01 IST

नगर परिषदेतील टीडीआर घोटाळा प्रकरणी गुरुवारी दोन माजी नगराध्यक्षांसह नगररचनाकार आणि सध्या अंबरनाथ नगर परिषदेत कार्यरत असलेले मुख्याधिकारी भालचंद्र

बदलापूर : नगर परिषदेतील टीडीआर घोटाळा प्रकरणी गुरुवारी दोन माजी नगराध्यक्षांसह नगररचनाकार आणि सध्या अंबरनाथ नगर परिषदेत कार्यरत असलेले मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी आणि चार अभियंत्यांसह ७ जणांविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची विकास योजना मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २००५ साली तर २००९ साली अंतिमरीत्या मंजूर केली. विकास योजनेच्या विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतूद क्रमांक १५.२.३ आणि १५.४.१ अनुसार जमीनमालकाने सार्वजनिक सुविधा विकास हस्तांतरण (टीडीआर) च्या बदल्यात ती जमीन विकसित करावी, अशी तरतूद आहे. परंतु, या तरतुदीचा वापर कसा करावा किंवा ही तरतूद प्रत्यक्षात कशी वापरावी, याच्या प्रत्यक्षात सूचना दिल्या नाहीत. याचाच गैरफायदा घेत योजनाबद्ध पद्धतीने टीडीआर प्रकरणात भ्रष्टाचार झाला होता. पोलीस तक्रारीत २०१० ते सप्टेंबर २०१३ या कार्यकाळातील नगराध्यक्ष असा उल्लेख केला आहे. मात्र, या काळात नगर परिषदेत चार नगराध्यक्षांनी काम पाहिले असले तरी तक्रारीत दोन माजी नगराध्यक्षांचा उल्लेख करण्यात आला. याप्रकरणी बदलापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांच्यासह बदलापूर नगर परिषदेचे तत्कालीन सहायक नगररचनाकार सुनील दुसाणे, तत्कालीन नगर अभियंते, तुकाराम मांडेकर, अशोक पेडणेकर, निलेश देशमुख आणि किरण गवळे या सात जणांविरुद्ध ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)