शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी-रिक्षांचा संप अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 05:49 IST

ओला, उबरसह अ‍ॅग्रीगेट सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून टॅक्सी-रिक्षांचा बेमुदत संप पुकारण्यात आला होता.

मुंबई : ओला, उबरसह अ‍ॅग्रीगेट सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून टॅक्सी-रिक्षांचा बेमुदत संप पुकारण्यात आला होता. मात्र, या संपातून टॅक्सी संघटनांनी पुन्हा माघार घेतली. १ सप्टेंबरला मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन मिळाल्यानंतर जय भगवान महासंघ व स्वाभिमान टॅक्सी संघटनांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतल्याची घोषणा केली. ओला, उबर टॅक्सींमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांचा रोजगार बुडत आहे. सरकारने तर या कंपन्यांना खुली सूटच दिली आहे. त्यामुळे ओला, उबरसारख्या खासगी सेवांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी करत नव्यानेच आलेल्या जय भगवान महासंघातर्फे २१ जून रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले आणि त्याला हिंसक वळणही लागले होते. त्यानंतर, चर्चेत आलेल्या या महासंघातर्फे २६ जुलै रोजी संपाची हाक दिली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देताच संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर, पुन्हा महासंघाकडून २९ आॅगस्ट रोजी बेमुदत टॅक्सी-रिक्षा संपाची हाक दिली आणि त्यात स्वाभिमान टॅक्सी संघटनाही उतरली. या संदर्भात रविवारी (२८ आॅगस्ट) परिवहन आयुक्तालयातही टॅक्सी संघटनांची बैठक झाली. या बैठकीवर स्वाभिमानकडून बहिष्कार टाकण्यात आला आणि तर बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर फक्त आश्वासनच मिळाल्याने, जय भगवान महासंघाने संपाची भूमिका घेतली होती. मात्र, संध्याकाळी या दोन्ही संघटनांकडून बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. परिवहनमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेत असल्याचे जय भगवान व स्वाभिमानकडून स्पष्ट करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी परिवहनमंत्र्यांसोबत बैठक बोलाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)