शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जेजे पुलावरील अपघातात टॅक्सी चालक ठार

By admin | Updated: August 24, 2015 01:35 IST

मैत्रिणीसोबत घरी परतत असलेल्या तरुणीचा कारवरचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावरुन दुसऱ्या दिशेने जात असलेल्या टॅक्सीवर धडकल्याची धक्कादायक घटना रविवारी

मुंबई : मैत्रिणीसोबत घरी परतत असलेल्या तरुणीचा कारवरचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावरुन दुसऱ्या दिशेने जात असलेल्या टॅक्सीवर धडकल्याची धक्कादायक घटना रविवारी पायधुनी येथे घडली. यामध्ये टॅक्सीचालक रमेशकुमार सोमनाथ गुप्ता (४१) जागीच ठार झाला. तर एक प्रवासी जखमी झाला असून जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहे. लालबाग येथील रहिवासी असलेली आशवी शाह (२०) हुंडाई वेर्ना या कारमधून मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सीएसटीहून जे. जे. पुलाकडून भायखळ्याच्या दिशेने येत असताना तिचा कारवरचा ताबा सुटला. कार दुभाजक ओलांडून सीएसटीच्या दिशेने जात असलेल्या गुप्ताच्या टॅक्सीवर आदळली. यात टॅक्सीचालक गुप्ता जागीच ठार झाले. टॅक्सीतील एक प्रवासी जखमी झाला. तर कारचालक आशवी शाहसह तिची मैत्रीणही या अपघातात किरकोळ जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी गुप्ताचा मृतदेह ताब्यात घेत जखमींना जवळच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी शाहला निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शाहची वैद्यकीय तपासणी केली असून यामध्ये ती मद्यधुंद नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)