कर जोडोनिया दोन्ही ।
चोखा जातो लोटांगणी ।।
ज्ञानेश्वर समाधीस्थ होणार असल्याची वार्ता सगळीकडे पसरली . तेव्हा या वार्तेची शहानिशा करण्याकरता साधूसंत वारकरी मंडळी आळंदीत दाखल झाले. ज्ञानेश्वर अल्पवयात का समाधी घेणार आहेत याचे कारण निवृत्तीनाथांनी सर्वाना समजावून सांगितले. निवृत्तीनाथांचे बोलणो ऐकून सगळयांच्या डोळयात पाणी आले. सद्दगीत कंठाने ज्ञानेश्वरा ज्ञानदेवा आम्हाला सोडून जाऊ नका असे अनेकांच्या तोंडात आले.
दशमीच्या दिवशी संत ज्ञानेश्वरांसहित सर्व वारक-यांनी भल्या पहाटे इंद्रायणीत स्थान केले, सिध्देश्वर मंदिरात जावून पूजा अर्जा केली. हि वार्ता सगळीकडे पसरली. इंद्रायणी काठी समुदाय जमू लागला, राहुटल्या उभा राहिल्या.भजनाचे किर्तनाचे कार्यक्रम सुरू झाले. सिध्दबेटावर ज्ञानेश्वरांचे शिष्य स्वरूपानंद सरस्वती ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करण्यात मगA झाले होते. पारायण संपल्यानंतर चोखोबांनी भजन करण्यास सुरूवात केली. साथीला नरहारी सोनार, गोरा कुंभार आणि सावतामाळी होते.
संत ज्ञानेश्वरांनी आदल्या दिवशी केलेल्या प्रवचनात अजुनही वारकरी मगA होते. विव्दता, संपत्ती, तारूण्य, अथवा सौंदर्य यामुळे मानुष्य o्रेष्ठ ठरत नाही. देहाची पवित्रता, निस्वार्थी बुध्दीमत्ता अशा गुणांमुळे मनुष्याचे o्रेष्ठत्व सिध्द होते. हे सर्व गुण तुमच्या जवळ असले तरच ख-या अर्थाने तुम्ही वारकरी व्हाल. तसेच यामुळे तुमच्यातील निराशा व दु:ख नाहीसे होवून आनंदच तुमच्या वाटयाला येईल. ही अध्यात्मिक उंची गाठवण्यासाठी तुम्हाला संतांचे मार्गदर्शन घेणो आवश्यक आहे.
हा वारकरी पंथ समानता आणि सहिष्णुतेचे प्रतिक आहे. सोवळयो ओवळयाचे वा कर्मकांडाचे अथवा जातीभेदाचे थोतांड नाही. परधर्माचे भय नसून रूढीपरंपरेचे बंधन नाही. शास्त्रने सांगितलेले विहित कर्म करण्याचे, गरूजनाां योग्यप्रकारे आदर राखण्याचे, आनंदाने संसार करून परमार्थ साधीत असता दु:खी कष्टी लोकांची सेवा करण्यातच खरी परमेश्वराची उपासना आहे. अशी अमृतवाणी कोणीही एैकली नव्हती त्यामूळे याचे बोल आठवत ज्ञानेश्वर माउली आपल्यातून जाणार या विवंचनेने हळहळ करत होते.
4उघडोनिया वेदार्थाचा ठेवा । केला तरणोपाय जीवा । ऐसा समर्थ ज्ञानदेव । तया चरणी ठेवा भाव । प्रत्यक्ष प्रचित लोचनी । अस्थी विरती जीवनी । पुढे सोन्याचा पिंपळ । ऐसी साक्ष असे अढळ । भजन झाल्यानंतर सर्वानी ज्ञानेश्वरांच्या चरणाचे दर्शन घेतले आणी एकमुखाने ज्ञानेश्वर माऊली । ज्ञानेश्वर माऊली । असा जयजयकार केला. संध्याकाळी नामदेवांचे कीर्तन झाले. याप्रसंगी आळंदी क्षेत्रतीलच नव्हे तर आळंदीच्या पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते.