शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरचा धूपप्रतिबंधक बंधारा मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 03:08 IST

किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा लवकरच मार्गी लागणार असून या बंधाऱ्याकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जि.प. च्या सदस्या शुभांगी कुटे यांनी सांगितले.

बोईसर : खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि भरतीच्या पाण्यामुळे तारापूर समुद्रकिनाऱ्यावरील घरांना सततच्या धोक्यापासून वाचवण्याकरिता त्या किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा लवकरच मार्गी लागणार असून या बंधाऱ्याकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे जि.प. च्या सदस्या शुभांगी कुटे यांनी सांगितले.या बंधाऱ्यासाठी मागील अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्याकरिता पाठपुरावा करतांना पालघर जिल्हा परिषदेमध्ये माझ्या पहिल्याच बैठकीत ठराव घेण्यात येऊन सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता, अशी माहिती त्यांनी दिली.२०० मीटर लांब व सात फूट उंच असलेल्या या बंधाऱ्याचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या नियोजित बंधाऱ्याच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नीरज चौरे व शाखा अभियंता बक्रू यांनी केली. त्या वेळी जि.प. सदस्या शुभांगी कुटे, राजू कुटे, अशोक दवणे, गजानन विंदे, विनायक तामोरे, अशोक पागधरे, विशाल नाईक, सुधीर दवणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर) >पहाणी करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नीरज चौरे व शाखा अभियंता बाखरू जि.प. सदस्या शुभांगी कुटे, राजू कुटे, अशोक दवणे, गजानन विंदे, विनायक तामोरे, अशोक पागधरे, विशाल नाईक, सुधीर दवणे आदी.>तारापूर येथील धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यापूर्वी पर्यावरण खात्याची परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर, निविदा प्रक्रिया काढण्यात येऊन २०० मीटर लांब, सात फूट उंच असा साधारणत: १० फूट रुंद बंधारा बांधण्यात येईल. - एस.टी. बाखरू, शाखा अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर