शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गवई, आंबेडकरांशी चर्चा करणार

By admin | Updated: August 30, 2015 02:44 IST

गटातटांत विभागून न राहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील एकच रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष खासदार रामदास आठवले

अकोला : गटातटांत विभागून न राहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील एकच रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. रिपब्लिकन ऐक्य केवळ बौद्ध समाजाचे न होता सर्व समाजांचे झाले पाहिजे, असे सांगत रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण राजेंद्र गवई व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त अकोला दौऱ्यावर आले असता रामदास आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सध्या शासनाकडून प्रत्येकी एक लाखाची मदत दिली जाते, मात्र ही मदत अत्यंत कमी आहे. त्यांना किमान १५ लाखांची मदत देण्यात यावी, अशी मागणी करतानाच यासाठी मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यासाठी शासनाने कार्यक्रम राबवून आंतरजातीय विवाह करणाऱ्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका असून, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय उशिराने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जातीला आरक्षण देण्यात यावे, मात्र हे आरक्षण देताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता निर्णय घेण्यात यावा. आरक्षण सर्वांनाच हवे आहे. त्यासाठी संसदेने कायदा करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची गरज!विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज योग्य प्रमाणात दिले जात नाही. त्यामुळे विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची गरज असल्याचे खा. आठवले यांनी सांगितले. विदर्भाने मुंबईवर विसंबून राहणे चालणार नाही. याबाबत केंद्र सरकारने विचार करावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.