शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावात अपघात; दोन जखमी

By admin | Updated: August 2, 2016 02:00 IST

चालकाच्या डोळ्यावर वाहनाच्या हेडलाइटचा तीव्र प्रकाशझोत पडल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

तळेगाव दाभाडे : चालकाच्या डोळ्यावर वाहनाच्या हेडलाइटचा तीव्र प्रकाशझोत पडल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुभाजक तोडून ट्रेलरने कंटेनरला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून, वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.हा विचित्र अपघात तळेगाव-चाकण रस्त्यावर येथील सेवाधाम हॉस्पिटलसमोर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने वेगळी करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र यामध्ये कालावधी जास्त गेल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गोविंद कल्लू यादव (वय २८, उत्तर प्रदेश) व महंमद इप्तिहार अब्दुलहबीब शेख (वय ३०, रा. न्हावाशेवा, ता. उरण, जि. रायगड) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. चाकणहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एमएच ४६ एच ६०९९) व लोखंडी कॉईल घेऊन विरुद्ध दिशेने जाणारा ट्रेलर (एमएच १४ ईएम ४७५२) तळेगाव स्टेशनजवळील सेवाधाम हॉस्पिटल येथे आले असता तीव्र प्रकाशझोत डोळ्यावर पडल्याने यादव यांचा वाहनावरील ताबा सुटला. दुभाजक तोडत ट्रेलर समोरून येणाऱ्या कंटेनरवर आदळला. यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. शेख यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. गोविंद यादव हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास पोलीस नाईक दीपक काटे करीत आहेत. (वार्ताहर)>सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे तळेगाव दाभाडे-चाकण रस्ता अपघाती रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अपघातानंतर होणाऱ्या वाहतूककोंडीचाही प्रवाशांना अनेकदा सामना करावा लागतो. या संदर्भात उपाययोजनांची मागणी होत आहे.