शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएच्या रडारवर टाल्कम पावडर

By admin | Updated: March 10, 2016 03:40 IST

टाल्कम पावडर अथवा बेबी पावडरमध्ये दुष्परिणाम करणारे घटक आहेत का? याची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनदेखील सज्ज झाले आहे.

पूजा दामले,  मुंबईटाल्कम पावडर अथवा बेबी पावडरमध्ये दुष्परिणाम करणारे घटक आहेत का? याची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. एफडीएने तीन दिवसांपूर्वी मुंबई आणि ठाणे परिसरातून नामांकित कंपन्यांच्या पावडरचे नमुने तपासणीसाठी घेतल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. अमेरिकेमध्ये एका महिलेने बेबी पावडर वापरल्यामुळे अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप करत, कंपनीविरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती. या महिलेच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला, पण तरीही तेथील एफडीएने पावडरमुळे अंडाशयाचा कर्करोग होण्याचा संबंध आहे, हे मान्य केले नाही. या प्रकरणानंतर ‘भारतीय मानक ब्युरो’ने (बीआयएस) चार दिवसांपूर्वी टाल्कम पावडर आणि बेबी पावडर संदर्भात एक बैठक घेतली होती. त्यामध्ये देशात वापरल्या जाणाऱ्या पावडरविषयी चर्चा झाली. त्यानंतर, महाराष्ट्र एफडीएने टाल्कम पावडर, बेबी पावडरचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या नमुन्यांमध्ये नामांकित कंपन्यांच्या टाल्कम पावडरचा समावेश आहे. त्याचबरोबर, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचेही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कंपनीकडे माहिती मागवल्यावर भारतात विक्री होणारी पावडर ही भारतातच तयार होते, अमेरिकेशी त्याचा संबंध नाही आणि एका देशात उत्पादित केलेल्या पावडरची आयात-निर्यात होत नाही, असे उत्तर देण्यात आले.