शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रिय संस्थांवर तलवार!

By admin | Updated: November 25, 2015 04:18 IST

वर्षानुवर्षे केवळ कागदावर असलेल्या राज्यातील ३ लाख २५ हजार धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवी संघटनांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.

मुंबई : वर्षानुवर्षे केवळ कागदावर असलेल्या राज्यातील ३ लाख २५ हजार धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवी संघटनांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. या संस्थांची मान्यता रद्द करण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. संस्था नोंदणी कायद्यांतर्गत (१९८६) धर्मादाय आयुक्तांकडे अशा संस्थांची नोंदणी केली जाते. सरकारने केलेल्या तपासणीमध्ये एकूण जवळपास ७ लाख ५९ हजार संस्थांपैकी ३ लाख २५ हजार संस्था अत्यंत निष्क्रिय असल्याचे समोर आले. या संस्थांच्या कामकाजाची तपासणी, आढावा घेण्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा विनाकारण वेळ जातो. या संस्थांनी करावयाचा करभरणा, त्यांचे लेखे, त्यांचे नूतनीकरण हा सगळा व्याप या कार्यालयाला सांभाळावा लागतो. काही संस्था ज्या उद्दिष्टासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या त्या उद्दिष्टापासून पुढे भरकटल्या असेही तपासणीत लक्षात आले. (विशेष प्रतिनिधी)अशी होईल कारवाईधर्मादाय आयुक्त आता सामाजिक आणि शैक्षणिक उद्दिष्टांसाठी स्थापन झालेल्या पण आज निष्क्रिय असलेल्या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावतील. नोंदणी रद्द करण्यापूर्वी अशा संस्थांना सुनावणी दिली जाईल, असे विधी व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. निवडणूकच नाही... अशा संस्थांना दर तीन वर्षांनी निवडणूक घेणे अनिवार्य असते; पण अनेक संस्थांमध्ये निवडणूकच झाली नसल्याची बाबही निदर्शनास आली आहे.१५ दिवसांत ‘ना हरकत’... मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले की, कलम ३६मधील दुरुस्तीमुळे संस्थांना बँकांचे कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक असलेले आयुक्तांचे ना हरकत प्रमाणपत्र केवळ १५ दिवसांच्या आत मिळू शकेल. सरकारने केलेल्या तपासणीमध्ये जवळपास एकूण ७ लाख ५९ हजार संस्थांपैकी ३ लाख २५ हजार संस्था अत्यंत निष्क्रिय असल्याचे समोर आले.या पार्श्वभूमीवर, राज्य मंत्रिमंडळाने आज मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्याच्या कलम २२ आणि ३६मध्ये दुरुस्ती करण्यास मान्यता दिली.