शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचे आठवड्यात ३ बळी

By admin | Updated: March 6, 2017 00:40 IST

मोशी येथील रहिवासी महिलेचा भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी (दि.४) मृत्यू झाला.

पिंपरी : मोशी येथील रहिवासी महिलेचा भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी (दि.४) मृत्यू झाला. स्वाइन फ्लूमुळे आठ दिवसांत शहरात तिसरा बळी गेला आहे. स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, एकाच आठवड्यात घडलेल्या तीन दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मोशी येथील ५४ वर्षीय महिलेवर भोसरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी या महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी, १ मार्चला पिंपळे गुरव येथील ५० वर्षीय महिलेचा चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी २८ फेब्रुवारीला एका ५५ वर्षीय महिलेचा असाच स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. एका आठवड्यात एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांमुळे स्वाइन फ्लूबद्दलची भीती पुन्हा पसरू लागली आहे. स्वाइन फ्लूने मृत्यू झालेले रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. साथीच्या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी खासगी डॉक्टर आणि महापालिकेचा वैद्यकीय विभाग यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. तातडीच्या उपाययोजना करून साथीच्या आजारावर नियंत्रण आणणे शक्य होते. परंतु समन्वयाचा अभाव असल्याने उपाययोजना वेळीच होत नाहीत.महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांची याबाबत उदासीनता दिसून येते. स्वाइन फ्लूने एखादी व्यक्ती दगावल्यास तातडीची बैठक घेऊन खासगी डॉक्टरांना योग्य त्या सूचना देणे आवश्यक असते. मात्र असे काही घडत नाही. खासगी डॉक्टरही महापालिकेच्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे महापालिकेकडे यंत्रणा असूनही ती योग्य वेळी कामी येत नाही. (प्रतिनिधी)>जनजागृती मोहीम सुरू गेल्या काही दिवसांत शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी नुकतीच एक बैठक घेऊन खासगी डॉक्टरांशी चर्चा केली आहे. त्यांना सूचना दिल्या आहेत. गरोदर महिला, उच्च रक्तदाब अशा रुग्णांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात टॅमी फ्लूू गोळ्या आणि स्वाइन फ्लूची लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. वैद्यकीय विभागाने जनजागृती मोहीमसुद्धा हाती घेतली आहे. एखाद्या संशयित रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर महापालिका आरोग्य विभागामार्फत तातडीने दखल घेतली जात आहे, असे वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोखले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.