शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-भाजपला रोखण्यासाठी ‘झाडू’: मिश्रा

By admin | Updated: November 16, 2015 00:11 IST

‘सत्तेच्या माध्यमातून सहकार व्यवस्था बिघडून गेली आहे.

सातारा : ‘शेतकऱ्यांसाठी सहकार चळवळ उभी केली; पण सध्या छोट्या शेतकऱ्यांसाठी सहकार हा शब्द स्वप्न ठरले आहे. कारण सहकार चळवळ पश्चिम महाराष्ट्रात काही परिवारांची मालमत्ता बनली आहे. त्यासाठी सामान्य घरातील झाडू दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला. तसेच महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपचे संघटन वाढविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे,’ असे प्रतिपादन ‘आम आदमी’चे महाराष्ट्राचे सहप्रभारी राजीव मिश्रा यांनी केले. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बातचित केली. यावेळी महिला कार्यकर्त्यां आभा मुळे, ‘आप’चे जिल्हा संयोजक एस. आर. भोगावकर, निरस मलिक, विजय यादव, अ‍ॅड. विकास साबळे, अ‍ॅड. इम्तियाज खान, उत्तम सावंत, विजयकुमार धोतमल, अतुल भोसले, विशाल कोळी, कृणाल चिकणे, अ‍ॅड. विजय खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. मिश्रा म्हणाले, ‘सत्तेच्या माध्यमातून सहकार व्यवस्था बिघडून गेली आहे. सहकारी चळवळीचा वापर स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी होऊ लागला आहे. काही परिवारांची मालमत्ता बनलेल्या साखर कारखाना, सूतगिरणी व इतर संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारामुळे सामान्य सभासदांना न्याय मागणे कठीण झाले आहे. दहशतवाद व दडपशाही यातून निवडणूक होत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी प्रामाणिक व जागरुक पत्रकारांनी पुढाकार घेऊन सामान्य शेतकऱ्यांना सहकारातील अधिकार मिळवून देण्यासाठी पुढे आले पाहिजे.’‘देशात काँग्रेस व भाजप असे दोन पक्ष सत्ता वाटून घेत होते; परंतु आप पक्षाने लोकांचे प्रश्न हाती घेऊन आंदोलन केले. लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे सामान्य घरातील झाडू दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला. महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपचे संघटन वाढविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. काँग्रेस व भाजप यांना रोखण्याचे काम फक्त आप करू शकतो; कारण जनतेला आता पर्याय हवा आहे. हे दिल्लीतील मतदारांनी दाखवून दिले आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)