शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भट परिवाराच्या ओंजळीत ‘सुयोग’

By admin | Updated: February 23, 2016 01:00 IST

ज्येष्ठ नाट्यनिर्माते व ‘सुयोग’ या नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे सुधीर भट यांच्या निधनानंतर, कथित वाद आणि चर्चेच्या फेऱ्यात अडकलेली ‘सुयोग’ ही संस्था अखेर सुधीर भट

मुंबई : ज्येष्ठ नाट्यनिर्माते व ‘सुयोग’ या नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे सुधीर भट यांच्या निधनानंतर, कथित वाद आणि चर्चेच्या फेऱ्यात अडकलेली ‘सुयोग’ ही संस्था अखेर सुधीर भट यांच्या परिवाराच्या ओंजळीत आली आहे. १९ फेब्रुवारी २०१६ पासून या संस्थेचा ताबा सुधीर भट यांच्या पत्नी कांचन भट यांच्याकडे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आले असल्याचे खुद्द कांचन भट यांनीच स्पष्ट केले आहे.सुधीर भट यांचे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाल्यानंतर ‘सुयोग’ या संस्थेत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गोपाळ अलगेरी यांनी ‘सुयोग’ची धुरा हाती घेतली. तेव्हापासून कांचन भट, तसेच त्यांचे पुत्र संदेश भट आणि गोपाळ अलगेरी यांच्यात या संस्थेच्या हक्कावरून वादाची ठिणगी पडली होती. परंतु आता सर्व वाद हे सामोपचाराने मिटल्याचे कांचन भट यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. या एकंदर प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या, सुधीर भट यांच्या नावावर असलेली शिवाजी मंदिरच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील जागा, तसेच त्यांच्या नावावर असलेली बस आणि संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीची हिशेब पत्रके देण्यास गोपाळ अलगेरी यांनी मध्यंतरीच्या काळात नकार दिला होता. त्यामुळे आम्ही त्यांना आमचे वकील अ‍ॅड.शिरीष देशपांडे यांच्यामार्फत नोटीस पाठवली. परंतु त्यांनी नोटिशीला उडवाउडवीची उत्तरे दिली. या संदर्भात आम्ही ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या मध्यस्तीनेतडजोड करण्याचा तसेच वकिलांच्या मार्फत तीन वेळा चर्चेचा प्रयत्नही केला होता. पण त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. पण आता १९ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्यात व गोपाळ अलगेरी यांच्यात ‘समजुतीचा करारनामा’ झाला आहे. त्यानुसार शिवाजी मंदिर येथील जागा व बस आमच्या नावावर झाली आहे. ‘सुयोग’ संस्थेची कुठलीही देणी-घेणी उरली नाहीत. हिशेबामध्ये फक्त इन्कमटॅक्सची जबाबदारी ७५ व २५ टक्के अशी ठरली आहे. यापुढे सुधीर भट यांचा वारसा माझा मुलगा संदेश भट चालविणार असून, तो नाट्यनिर्माता म्हणून काम पाहणार आहे. (प्रतिनिधी)सुधीर भट यांचे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाल्यानंतर ‘सुयोग’ या संस्थेत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गोपाळ अलगेरी यांनी ‘सुयोग’ची धुरा हाती घेतली. तेव्हापासून कांचन भट, तसेच त्यांचे पुत्र संदेश भट आणि गोपाळ अलगेरी यांच्यात या संस्थेच्या हक्कावरून वादाची ठिणगी पडली होती.