शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

वह्या खरेदीला स्थगिती

By admin | Updated: July 21, 2015 01:26 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वही खरेदी प्रक्रिया स्थगित करण्यात आली

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वही खरेदी प्रक्रिया स्थगित करण्यात आली. खरेदी प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने सदर निविदा प्रक्रिया स्थगित करावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्याप वह्या पुरविता आल्या नसल्याची स्पष्ट कबुली आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी आदिवासी शाळांतील मुलींना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबतचा मुद्दा उपस्थित केला. राज्यातील शाळा सुरू होऊन महिना उलटून गेला; तरी आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप सोयी-सुविधा व आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलध झाले नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला होता. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान मंत्री सवरा म्हणाले की, राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकूण ४९० वसतिगृहे आहेत. यातील ३३४ वसतिगृहे ही शासकीय इमारतींत तर १५६ वसतिगृहे भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. यातील २०७ वसतिगृहे ही आदिवासी मुलींसाठी असून, येथे आदिवासी विकास विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरविण्यात येतात. मात्र, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश देण्यात आले नसून एका महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील, असे आश्वासन सवरा यांनी दिले. मंत्र्यांच्या उत्तरानंतर, वह्या-पुस्तकासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाला स्थगिती का दिली, यात कोणता गैरव्यवहार झाला, याची उच्चस्तरीय चौकशी करणार का, अशा प्रश्नांची सरबत्तीच विरोधी सदस्यांनी केली. मात्र, खरेदीच झालेली नसल्याने गैरव्यवहार झाल्याचा आरोप निराधार असल्याचा दावा आदिवासी विकास मंत्र्यांनी केला. गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मंत्री सवरा यांना कोंडीत पकडल्याने सभापती निंबाळकर यांनी याविषयी आमदारांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सरकारला दिले.