शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या शिक्षेला स्थगिती

By admin | Updated: May 9, 2015 02:32 IST

‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरणी अभिनेता सलमान सलीम खानला सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली

मुंबई : ‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरणी अभिनेता सलमान सलीम खानला सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. सलमानला ३० हजारांचा जामीनही न्यायालयाने मंजूर केला. या वृत्ताने सलमानच्या चाहत्यांनी न्यायालयाबाहेर एकच जल्लोष केला. उच्च न्यायालयाची प्रत हाती आल्यानंतर सलमान सायंकाळी सत्र न्यायालयात हजर झाला व त्याने जामिनाची प्रक्रियादेखील पूर्ण केली. वांद्रे येथे २८ सप्टेंबर २००२ रोजी भरधाव गाडी चालवत पाच जणांना चिरडले. यात एकाचा बळी गेला होेता. या प्रकरणी बुधवारी सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याच दिवशी उच्च न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सलमानने या शिक्षेविरोधात अपील याचिकाही न्यायालयात दाखल केली. शुक्रवारी न्या. अभय ठिपसे यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. त्यात सलमानचा जामीन पुढेही कायम राहणार की त्याला तुरुंगात जावे लागणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण न्यायालयाने जामीन रद्द केला असता, तर सलमानला कारागृहात जावे लागले असते.मात्र न्या. ठिपसे यांनी न्यायालयातील तरतुदींचा आधार घेत सलमानची अपील याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेत त्याला जामीन मंजूर केला. अ‍ॅड. अमित देसाई यांनी सलमानला परदेशी जाण्यास अर्ज करायलाही परवानगी द्यावी, अशी विनंती केली. अर्ज करण्याचा अधिकार सलमानकडून कोणी हिरावून घेतलेला नाही. त्याने यासाठी रीतसर अर्ज करावा व त्यावर न्यायालय सुनावणी घेऊन निर्णय देईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.शिक्षेला स्थगिती का?तसेच सर्वसामान्यपणे एखाद्या आरोपीने सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्याची शिक्षा रद्द केली जाते. मात्र या प्रकरणात सरकारी पक्षाने शिक्षा रद्द करण्याला विरोध केला आहे. पण कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेला स्थगिती देण्यात काही गैर नाही. त्यामुळे सलमानची शिक्षा स्थगित केली जात आहे, असे न्या. ठिपसे यांनी स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी आता १५ जूनला होणार आहे.