शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बहुसदस्यीय पालिका प्रभागांना स्थगिती नाकारली

By admin | Updated: October 25, 2016 01:51 IST

राज्यपालांच्या अध्यादेशाने लागू झालेल्या कायद्याची अंमलबजावणी थांबवू शकत नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील महानगरपालिका

नागपूर : राज्यपालांच्या अध्यादेशाने लागू झालेल्या कायद्याची अंमलबजावणी थांबवू शकत नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांसाठीच्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेस अंतरिम स्थगिती देण्यास सोमवारी नकार दिला.दारव्हा नगर परिषदेचे सदस्य हरिभाऊ गुल्हाने व सईद फारुख सईद करीम आणि नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी यासाठी वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्या. भूषण गवई व न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्यपालांना राज्यस्तरावर अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आहे. परंतु, हा अधिकार कोणत्या परिस्थितीत व कसा वापरायचा यासंदर्भातील विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये सात सदस्यीय घटनापीठासमक्ष प्रलंबित आहे. यामुळे तेथे होणाऱ्या निर्णयाची प्रतिक्षा करण्याचे ठरवून खंडपीठाने कोणताही अंतरिम स्थगिती आदेश न देता या दोन्ही याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतल्या.राज्य शासनाने महानगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यासाठी ७ मे २०१६ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका कायदा आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक वसाहत कायद्यात दुरुस्ती केली. याविषयी राज्यपालांनी १९ मे २०१६ रोजी पहिला अध्यादेश जारी केला. हा सुधारित कायदा १८ जुलै २०१६ रोजी विधानसभेत पारित झाला. परंतु, या कायद्याला विधान परिषदेची मंजुरी मिळू शकली नाही. दरम्यान, पहिल्या अध्यादेशाची मुदत २८ आॅगस्ट २०१६ रोजी संपली. हा अध्यादेश कायम ठेवण्यासाठी ३० आॅगस्ट २०१६ रोजी दुसरा अध्यादेश जारी करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाने या अध्यादेशानुसार १७ आॅक्टोबर २०१६ रोजी आदेश जारी करून निवडणूक कार्यक्रम घोषित केला.राज्यपालांचा दुसरा अध्यादेश अवैध आहे. परिणामी निवडणूक आयोगाचा आदेशही अवैध ठरतो. हा अध्यादेश व आदेश रद्द करण्यात यावा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.एका प्रभागात अनेक नगरसेवकअध्यादेशानुसार महानगरपालिकेच्या प्रभागात किमान तीन व कमाल चार तर, नगर परिषदेच्या प्रभागात किमान दोन व कमाल तीन उमेदवार उभे राहू शकतात. यावेळी नगर परिषद अध्यक्षाची निवड थेट निवडणुकीतून करण्यात येणार आहे.