शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

Sushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ते पाहिले; शरद पवारांचा टोला

By कुणाल गवाणकर | Updated: September 29, 2020 15:53 IST

जवळपास दीड महिना होऊनही सीबीआयचे हात रिकामेच

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या हाती अद्याप तरी ठोस काही हाती लागलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती तपास देऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीबीआयवर सडकून टीका केली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी वेगळी तपास यंत्रणा नेमली गेली. तिनं काय दिवे लावले ते पाहिले, अशा शब्दांत पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं. त्यांना सत्तेत वाटा मिळेल, अशी थेट ऑफर देणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला. 'आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक तरी आमदार निवडून येतो का? आठवले बोलत असतात. मार्गदर्शन करत असतात. त्यांना संसदेत आणि संसदेबाहेरही कोणी गांभीर्यानं घेत नाही,' असा टोला शरद पवारांनी लगावला.सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. त्यावरून खासदार उदयनराजे, संभाजीराजे छत्रपती यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. 'भाजपकडून उदयनराजेंची निवड राज्यसभेवर करण्यात आली. तर संभाजीराजे छत्रपती यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून करण्यात आली आहे. पण ते राष्ट्रपती नियुक्त सदस्य असले, तरी त्यांचं नाव पंतप्रधानांकडून सुचवण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षण प्रकरणात सहकार्य करावं,' असं आवाहन शरद पवारांनी केलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRamdas Athawaleरामदास आठवले