शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी बालकांचे सर्वेक्षण

By admin | Updated: September 18, 2016 02:01 IST

बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या कामास प्राधान्य देवून कुपोषित बालकांची नव्याने अद्ययावत यादी तयार करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले

हितेन नाईक,

पालघर- पालघर जिल्ह्यातील अंगणवाड्यामधील सर्व बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या कामास प्राधान्य देवून कुपोषित बालकांची नव्याने अद्ययावत यादी तयार करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुपोषणाबाबत आज बैठक आयोजित करण्यात आली असताना या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आदी उपसाठीत होते.या बैठकीत कुपोषणाबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश देताना जव्हार, मोखाडा, वाडा व विक्र मगड या तालुक्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे दि. १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१६ दरम्यान सर्वेक्षण करण्यात यावे. या सर्वेक्षणानंतर तीव्र व अती तीव्र कुपोषित (एमएएम व एसएएम ) बालकांची यादी अद्ययावत करण्यात यावी. ही यादी प्रत्येक दिवशी अंगणवाडी पर्यवेक्षिकांमार्फत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपकेंद्रनिहाय अद्ययावत केलेल्या यादीतील कुपोषित मुलांच्या १०० टक्के तपासणीसाठी उपकेंद्रनिहाय नियोजन करण्यात यावे. आवश्यकतेनुसार इतर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच इतर जिल्ह्यातीलही तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवाही याकामी उपलब्ध करून घेण्यात याव्या असे हि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.दि. २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०१६ या कालावधीत सर्व मुलांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत संबंधित उपकेंद्रावर केली जाईल याची दक्षता घेण्यात यावी. या कालावधीमध्ये एखाद्या बालकाची परिस्थिती गंभीर आढळून आल्यास अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी त्वरीत ही बाब संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणने आवश्यक आहे. संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी त्वरीत सदर मुलांची प्राधान्याने तपासणी करु न उपचार सुरू करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)।सर्व खातेप्रमुखांनाही जुंपले गेले तपासणीच्या कार्यालाजिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण ) यांनी स्वत: वैयक्तिकस्तरावर वरील नियोजनाप्रमाणे कार्यवाही होईल याबाबत खबरदारी घ्यावी. हे सर्वेक्षण पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग व आदिवासी विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी हे सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत सुट्टीच्या दिवशीही हे काम करतील. संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या रजा या काळात मंजूर करू नयेत. बालकांचे सर्वेक्षण विहित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित कार्यालय प्रमुख यांनी व्यक्तीश: लक्ष देवून त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.