शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जन्मपत्रिकेनुसार झालेल्या विवाहांचा सर्व्हे करावा

By admin | Updated: November 22, 2014 03:04 IST

जन्मपत्रिका पाहून त्यानुसार गुण जुळत असतील तरच विवाह करण्याचा शिरस्ता वर्षोनुवर्षापासून चालत आलेला आहे,

पुणे : जन्मपत्रिका पाहून त्यानुसार गुण जुळत असतील तरच विवाह करण्याचा शिरस्ता वर्षोनुवर्षापासून चालत आलेला आहे, तरीही त्यानुसार झालेले विवाह अयशस्वी ठरल्याचे मोठे प्रमाण समाजामध्ये पहायला मिळते. त्यातील थोतांड आकडेवारीनिशी समोर यावे, याकरिता महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जन्मपत्रिकेनुसार झालेल्या विवाहांचा सर्व्हे करावा अशी सूचना प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केली आहे.आयुका येथे झालेल्या अनौपचारीक कार्यक्रमामध्ये डॉ. नारळीकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी सुचविल्यानुसार अंधश्रध्दा निर्मुलन समितीला ५ लाख रुपयांचा पुरस्कारही यावेळी देण्यात आला. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.जयंत नारळीकर यांच्या पुढाकाराने अंनिसच्या वतीने मंतिमंद मुलांच्या जन्मपत्रिका शोधण्याचे आव्हान ज्योतिषांना देण्यात आले होते. ज्या ज्योतिषांनी हे आव्हान स्वीकारले होते त्यामध्ये त्यांना सपशेल अपयश आल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवरच नारळीकरांनी जन्मपत्रिका पाहून झालेल्या विवाहांचा सर्व्हे करावा, अशी सूचना अंनिसच्या कार्यकर्त्यांना केली आहे.पत्रिकेमध्ये कडक मंगळ अशा कारणाखाली अनेक मुला-मुलींची लग्ने अडून राहतात. कुंडलीतले सर्वच्या सर्व गुण जुळल्यानंतरही झालेले विवाह पहिल्या महिन्यातच अयशस्वी ठरल्याची उदाहरणे समाजामध्ये सर्रास पहायला मिळातात. या सर्वांचा रितसर अभ्यास होऊन त्याचे डॉक्युमेंटेशन व्हावे, असे नारळीकरांनी सुचविले आहे.