शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडमिलवरील व्यायामाला सुरक्षेची झालर

By admin | Updated: August 3, 2016 00:44 IST

ट्रेडमिलच्या साह्याने घरच्या घरी तसेच जिममध्ये व्यायाम केला जातो.

प्रज्ञा केळकर-सिंग,

पुणे- ट्रेडमिलच्या साह्याने घरच्या घरी तसेच जिममध्ये व्यायाम केला जातो. मात्र, ट्रेडमिलच्या वेगाशी समतोल साधता न आल्याने किरकोळ, गंभीर दुखापतीच्या घटना घडतात. त्या टाळण्यासाठी संकेत आणि रिशी या अभियांत्रिकी शाखेच्या दोन विद्यार्थ्यांनी सेन्सरच्या साह्याने ट्रेडमिलचा वेग नियंत्रणात ठेवता येईल, अशा प्रकारचे अनोखे तंत्र विकसित केले आहे. या संशोधनाबाबत विद्यार्थ्यांनी पेटंटसाठी अर्जही केला आहे.वर्क आऊटसाठी ट्रेडमिलचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी ट्रेडमिल हा उत्तम पर्याय आहे, अशी सर्वसाधारण समजूत असते. गेल्या १० वर्षांमध्ये हे उपकरण वापरणाऱ्यांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बऱ्याच अद्ययावत ट्रेडमिलमध्ये इनबिल्ट टीव्ही, वायफाय कनेक्शन, वायडर बेल्ट, कस्टम बिल्ट अशा सुविधांचा समावेश असतो. त्याचबरोबर, कन्झ्युमर प्रोडक्ट सेफ्टी कमिशननुसार, ट्रेडमिल सर्वांत धोकादायक फिटनेस उपकरण आहे. मशीन चालू स्थितीत असताना लक्ष भरकटल्यास आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. २००९मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, ट्रेडमिलवर व्यायाम करताना १९,००० लोकांना गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये हाडांना इजा, डोक्याला दुखापत आदींचा समावेश होता. अशा इजा टाळण्यासाठी ताथवडेतील जेएसपीएमच्या राजर्षी शाहू कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा संकेत छाजेड आणि पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचा रिषी मदेथट्ट या दोन विद्यार्थ्यांनी ६ महिने मेहनत घेऊन ट्रेडमिलवरील धोका कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संशोधन केले आहे.ट्रेडमिलवर धावण्याची गती, चालण्याची पद्धत मोजण्याचे विशिष्ट तंत्र या दोघांनी विकसित केले आहे. या मोजमापासाठी ट्रेडमिलमध्ये वैैशिष्ट्यपूर्ण सेन्सरचा वापर केला जाऊ शकतो. सेन्सरच्या साह्याने व्यायाम करणाऱ्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार वेग नियंत्रित करणे, संबंधित व्यक्ती थकल्यास वेग आपोआप कमी होणे, क्षमतांचा शोध घेऊन त्यानुसार प्रोग्रॅम तयार करणे असे या तंत्राचे उपयोग होऊ शकतात. सेन्सरच्या माध्यमातून मिळालेला डेटा वर्क आऊटचे प्रमाण ठरवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास संकेत आणि रिषी यांनी व्यक्त केला. सेन्सरच्या साह्याने ट्रेडमिल नियंत्रित करता आल्यास दुखापतीच्या घटनांवर नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी सांगितले.>संकेत हा सिव्हिल, तर रिषी हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन शाखेशी संबंधित आहे. ते दोघे पूर्वीपासूनचे मित्र. अभियांत्रिकीचे केवळ पुस्तकी शिक्षण न घेता, दैैनंदिन जीवनात या ज्ञानाचा उपयोग करता यावा, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. जिममध्ये वर्क आऊट करीत असताना त्यांना ट्रेडमिलचे धोके आणि मर्यादा लक्षात आल्या. या मर्यादांवर मात करून ट्रेडमिलचे वर्क आऊट सुरक्षित करता यावे, या दृष्टीने त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. त्यातूनच सेन्सरचे अनोखे तंत्र विकसित झाले.