शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग

By admin | Updated: November 19, 2016 03:03 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर झाली.

आविष्कार देसाई,

अलिबाग- रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. आरक्षणामुळे प्रस्थापितांसह दिग्गजांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागला आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना आता नवीन मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे, अथवा कुटुंबातील सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून स्वप्नपूर्ती करावी लागेल, असे चित्र दिसत आहे. काढलेल्या आरक्षणामध्ये महिलांसाठी सर्वाधिक ३० जागा आरक्षित ठेवण्यात आल्याने जिल्हा परिषदेवर महिलांचे वर्चस्व राहणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी आरक्षण जाहीर केले. समीर मुदगल या लहान मुलाच्या हस्ते आरक्षणाची सोडत काढली. याप्रसंगी विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका निर्मितीच्या बाजूने उच्च न्यायालयात निकाल लागल्याने आधी काढण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले. त्यानुसार आता नव्याने आरक्षणाची सोडत काढली आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी सर्वाधिक ३० जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, तर २९ जागा या सर्वसाधारण गटासाठी आहेत. पनवेल तालुक्यातील पालीदेवद हा मतदार संघ अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला. अनुसूचित जमातीसाठी पनवेल तालुक्यातील वावंजे, माणगाव-निजापूर, कर्जत-नेरळ आणि सावेळे, पनवेल- वडघर यांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आठ मतदार संघ आरक्षित झाले. त्यामध्ये मुरुड तालुक्यातील उसरोली, पोलादपूर- देवळे, अलिबाग- शहापूर, माणगाव- तळाशेत, म्हसळा- पाभरे, महाड- नाते, अलिबाग -चेंढरे, माणगाव- मोर्बा या मतदार संघाचा समावेश आहे.मतदार संघातील आरक्षणामुळे दिग्गजांना फटका बसला आहे. त्यामुळे काहींच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागल्याचे बोलले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे यांचा कर्जत तालुक्यातील नेरळ मतदार संघ अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्षांना शेजारील नवीन मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे. शेकापचे आस्वाद पाटील यांचा अलिबाग तालुक्यातील शहापूर मतदार संघ नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित ठेवला आहे. त्यांनाही आरक्षणाचा चांगलाच फटका बसला आहे. पाटील यांना नवीन मतदार संघ शोधावा लागेल. तसेच शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या थळ मतदार संघात सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडले आहे. तेथे दळवी हे पत्नीला उभे करण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वहिनी शुभदा तटकरे यांनाही आरक्षणाचा फटका बसला आहे. रोहे तालुक्यातील आंबेवाडी मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादीपासून फारकत घेतलेले शामकांत भोकरे यांचा श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन मतदार संघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. शिवसेनेचे बाळकृष्ण राऊळ यांचा महाड तालुक्यातील नाते मतदार संघ नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित ठेवल्याने त्यांनाही नव्याने मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे.>आरक्षण बदलाने इच्छुकांची नाराजीम्हसळा : तालुक्यातील दोन जागांसाठी आरक्षण बदलल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषदेत जाण्याचे स्वप्न भंग झाले आहे. तालुक्यातील वरवठने व पाभरे या गटासाठी पहिले सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले होते. यामुळे या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता होती. अनेक दिग्गजांना या आरक्षण सोडतीनंतर धक्का बसला आहे.आता नव्याने पडलेल्या आरक्षणामध्ये वरवठने गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.म.प्र.) तर पाभरे गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव (ना.म.प्र. महिला) असे पडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य नाजीम हसवारे, समीर बनकर, नंदू शिर्के, जि. प. सदस्या वैशाली सावंत हे जिल्हा परिषदेच्या रिंगणातून आऊट झाले.राष्ट्रवादीकडून सभापती महादेव पाटील, जिल्हा परिषद सदस्या हिरा बसवत, अंकुश खडस तर शिवसेनेकडून माजी प्रभारी सभापती रवींद्र लाड, अनिल काप यांची उत्सुकता कायम आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी म्हसळा तालुक्याला वाऱ्यावर सोडल्याने राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेला ही निवडणूक कठीण जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.