शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशदादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

By admin | Updated: September 2, 2016 13:11 IST

घरकूल प्रकरणात गेल्या साडेचार वर्षांपासून अटकेत असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केला.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. २ -  घरकूल प्रकरणात गेल्या साडेचार वर्षांपासून अटकेत असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर केला. सध्या सुरेशदादा जैन हे धुळे कारागृहात असून जामिनाची पूर्तता केल्यानंतर ते शनिवारी जळगावात येण्याची शक्यता आहे. घरकूल प्रकरणात दाखल गुन्ह्यात सुरेशदादा जैन यांना १० मार्च २०१२ रोजी रात्री साडेअकरा वाजता धरणगाव रेल्वेगेटजवळ अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरूंगात होेते. त्यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात तब्बल १० वेळा दाखल केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आज ११वा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने विनाशर्त मंजूर केला. न्या. शरद बोबडे व न्या.भूषण यांच्या द्विसदस्यीय पीठाने दोन बाबींवर विचार करून हा निर्णय दिला. त्यात साडेचार वर्ष भोगलेला कारावास व सर्व प्रमुख साक्षीदारांची झालेली साक्ष, या बाबींचा समावेश होता. जैन यांच्यातर्फे अ‍ॅड.कपिल सिब्बल यांनी काम पाहिले. घरकूल खटला सध्या धुळे येथील न्या.आर.आर. कदम यांच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. फिर्यादी प्रवीण गेडाम व तपास अधिकारी ईशु सिंधू यांच्यासह प्रमुख साक्षीदारांच्या साक्ष व उलटतपासणीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. २ रोजी माजी नगराध्यक्ष सिंधू कोल्हे यांच्यावर आरोप निश्चितीचे कामकाज सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजुरीचे वृत्त पोहोचले. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विनाशर्त जामिन असल्याने सुरेशदादा जैन शनिवारी जळगावात पोहोचण्याची शक्यता आहे.

सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर होताच शिवसेनेतर्फे फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.