शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुप्रीम कोर्टाच्या कौतुकाला मंत्रालयातच तडे

By admin | Updated: April 30, 2017 05:35 IST

दिव्यांगांना इतरांप्रमाणे सोयी-सुविधा देण्याबाबत महाराष्ट्र सरकारचे थेट सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे कौतुक केले असले तरी खुद्द मंत्रालयातच त्यांच्यासाठी कोणतीही

- यदु जोशी, मुंबई

दिव्यांगांना इतरांप्रमाणे सोयी-सुविधा देण्याबाबत महाराष्ट्र सरकारचे थेट सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे कौतुक केले असले तरी खुद्द मंत्रालयातच त्यांच्यासाठी कोणतीही विशेष सुविधा उपलब्ध नाही. कोणाच्या तरी आधाराने वा घुसत घुसतच त्यांना मंत्रालयात यावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना दिव्यांग असे संबोधित करण्याचे आवाहन देशाला केल्यानंतर किमान भाजपाशासित राज्यांमध्ये दिव्यांगांच्या सोयी-सुविधांबाबत विशेष काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे. तथापि, इतर शासकीय कार्यालये तर सोडाच, पण मंत्रालयातदेखील असे काहीही अद्याप झालेले नाही. दिव्यांगांसाठीच्या १९९५ च्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भातील एका याचिकेवर कोणत्या राज्याने कोणत्या दिव्यांगस्नेही उपाययोजना केल्या आहेत याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागितली. राज्य सरकारने आम्ही अंमलबजावणी पूर्ण केली, असे प्रतिज्ञापत्र केले. दोन दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशात न्यायालयाने याची नोंद घेतली व हा कायदा पूर्णांशाने लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे चित्र दिसले. एकीकडे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयास असे सांगत असताना दिव्यांगांची मंत्रालयातील हेळसांड खटकणारी आहे. रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिव असताना दिव्यांगांना मंत्रालयात आणून नंतर सोडण्याचीही व्यवस्था केली जाणार होती. त्याच्या बातम्याही झाल्या, पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही.अटेंडंटदेखील नेमले नाहीत- दिव्यांगांसाठी जनता जनार्दन गेट आणि आरसा गेटवर दोन व्हीलचेअर आणि दोन अटेंडंट असतील. ते अटेंडंट दिव्यांग बांधवांना ज्या मजल्यावर, ज्या कार्यालयात काम आहे तेथे घेऊन जातील आणि परत आणून सोडतील, अशी व्यवस्था दीड वर्षापूर्वी मंत्रालयात होऊ घातली होती. - स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे आदेश दिले होते. त्यानुसार यंत्रणेने दोन व्हीलचेअरदेखील खरेदी केल्या. पण त्या दोन्ही गेटवर काही दिवस पडून राहिल्या आणि नंतर तेथून गायब झाल्या. त्यांचा एकही दिवस उपयोग करण्यात आला नाही. अटेंडंटदेखील नेमण्यात आले नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयात सदर प्रतिनिधीने अनेकदा पाठपुरावा करूनदेखील ही सुविधा अमलात आलीच नाही.