शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांकडून पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 05:29 IST

सर्वोच्च न्यायालयाने ‘अर्नेशकुमार वि. बिहार शासन’ प्रकरणात दिलेल्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांनी पायमल्ली केली आहे.

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ‘अर्नेशकुमार वि. बिहार शासन’ प्रकरणात दिलेल्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांनी पायमल्ली केली आहे. यामुळे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाचे न्यायाधीश जे. आर. गाडगे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित बंडीवार व तपास अधिकारी के. आर. गवई (पोलीस उपनिरीक्षक) यांना फटकारून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.प्रकरणातील माहितीनुसार, २८ आॅक्टोबर रोजी झांशी राणी चौक येथे सीताबर्डी पोलिसांनी आरोपी हरिश्वर मेंढरे यांच्यावर हेल्मेट घातले नसल्यामुळे कारवाई केली. दरम्यान, मेंढरे व पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. हा गोंधळ पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी गोळा झाली होती. यानंतर मेंढरे यांना पोलीस ठाण्यात नेऊन भादंविच्या कलम ३५३, ३३२ व २९४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता मेंढरे यांना तत्काळ अटकही केली. परिणामी सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयाची पायमल्ली झाली. सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कारावासाच्या शिक्षेचा गुन्हा असल्यास विशिष्ट कारण नोंदविल्याशिवाय कोणालाही अटक करता येत नाही असे संबंधित निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मेंढरे यांनी केलेल्या गुन्ह्यात केवळ तीन वर्षे कारावासापर्यंतची शिक्षा आहे. असे असताना मेंढरे यांना २८ तारखेचा पूर्ण दिवस व रात्र आणि २९ तारखेचा पूर्ण दिवस कारागृहात घालवावा लागला. जेएमएफसी न्यायालयाने त्यांना मुक्त करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. अभियांत्रिकी पदवीधारक असलेले मेंढरे व्यवसायाने बिल्डर आहेत. मेंढरे यांच्यातर्फे अ‍ॅड. आकाश गुप्ता यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)