शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

समर्थकांची जाळपोळ

By admin | Updated: June 5, 2016 00:35 IST

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरसह वरणगाव, बोदवड, सावदा शहर बंद केले़ महामार्गावर ‘रास्ता रोको’

जळगाव : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरसह वरणगाव, बोदवड, सावदा शहर बंद केले़ महामार्गावर ‘रास्ता रोको’ केल्यानंतर वाहतूक ठप्प झाली, तर वरणगावसह भुसावळ येथे ट्रकसह बसच्या काचा फोडण्यात आल्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतर्फे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भुसावळात नाहाटा चौफुलीवर दुपारी ‘रास्ता रोको’ करण्यात आला़ आंदोलनामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या़ मुक्ताईनगरात महामार्ग ठप्पमुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी गावातील बाजारपेठ बंद करत बोदवड चौफुलीवरील महामार्ग रोखून धरला, तसेच ट्रकच्या काचा फोडत मुख्यमंत्र्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दगडफेकीत एका ट्रकच्या काचा फुटल्या़पदाधिकाऱ्यांचे राजीनामे- खडसेंच्या राजीनाम्यानंतर भुसावळ विभागात राजीनामा सत्र सुरू झाले आहे़ - सावदा येथील भाजपा शहर पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडे सुपुर्द केले.- भुसावळ शहरातील नगरसेवक, भाजपा शहर पदाधिकारी, कार्यकारी, सर्व आघाड्यांचे सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत. याशिवाय भाजपाच्या जि़प़, पं़स़, सदस्यांसह ग्रामपंचायत सदस्यही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्र्यांचा निषेध मुक्ताईनगरातील रक्षा पेट्रोल पंपासमोर वाहने आडवी लावून संपूर्ण महामार्ग रोखून धरण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा दिल्या. खडसेंचे स्वीय सहायक योगेश कोलते आल्यानंतर त्यांनी अशा घोषणा देण्यास प्रतिबंध केला.