शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

एडसग्रस्तांना मदतीचा आधार

By admin | Updated: July 22, 2014 00:38 IST

राज्यातील पहिलाच प्रयोग

अकोला: एडसग्रस्तांचा शोध घेऊन, त्यांना मदतीचा आधार देण्याचा उपक्रम अकोला जिल्ह्यात महसूल विभागामार्फत राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एड्सग्रस्तांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा आर्थिक मदत दिली जात असून, अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.समाजात बहिष्कृत जीवन जगणार्‍या एड्सग्रस्तांना आर्थिक मदत करुन, त्यांना दिलासा देण्यासाठी, महसूल विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गत वर्षभरात एड्सग्रस्त रुग्णांचा शोध घेण्यात आला. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालयामार्फत जिल्ह्यातील एड्सग्रस्त रुग्णांच्या याद्या तयार करण्यात आल्या. या यादीनुसार एड्सग्रस्तांची संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार अकोला महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ३९६ एड्सग्रस्त रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा प्रत्येकी ६00 रुपयांप्रमाणे महसूल विभागामार्फत मदतीचे वाटप सुरु करण्यात आले आहे. अशा प्रकारे गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील एड्सग्रस्तांना मदतीचे वाटप सुरु आहे. सामाजिक जाणिवेतून एड्सग्रस्त रुग्णांना दरमहा आर्थिक मदतीव्दारे आधार देण्याचा उपक्रम अकोल्यात राज्यात पहिल्यांदाच राबविला जात आहे. एड्सग्रस्तांना दिली जाणारी दरमहा आर्थिक मदत मोठी नसली तरी, त्यांच्यासाठी ती महत्वाचा आधार ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.