शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

राज ठाकरेंच्या भूमिकेचे जांबुवंतराव धोटेंकडून समर्थन

By admin | Updated: July 29, 2016 16:27 IST

अ‍ॅट्रॉसीटी कायद्याचा दिवसेंदिवस गैरवापर होत आहे. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या वस्तुनिष्ठ आणि साहसिक भूमिकेला आपले समर्थन आहे.

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. २९ :  अ‍ॅट्रॉसीटी कायद्याचा दिवसेंदिवस गैरवापर होत आहे. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या वस्तुनिष्ठ आणि साहसिक भूमिकेला आपले समर्थन आहे. जात आणि धर्माचा अनुनय करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे, असे माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी येथील विश्रामगृहात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

धोटे म्हणाले, अनेक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षतेच्या घोषणा देत जाती व्यवस्था मोडीत काढून समान कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. मात्र ७0 वर्षे उलटल्यानंतरही अद्याप जात मोडीत न निघता जातीयवाद वाढत आहे. सर्वच पक्ष केवळ मतांसाठी जातीचा मुद्दा जिवंत ठेवत आहेत. सर्वांसाठी एकच कायदा हे तत्व असताना, जातीनुसार कायदे केले जात आहे. भविष्यात सर्वच समाज, जाती आमच्यासाठी कायदा करा, अशी मागणी करतील. हे सर्व थांबले पाहिजे.

सध्या राजकारण मूल्यहिन, चरित्रहिन झाले आहे. अ‍ॅट्रॉसीटी कायद्याचा गैरवापर वाढला आहे. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शस्त्र परवाना देण्याची मागणी केली. त्यामुळे देशात यादवी माजेल. याबाबत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका अत्यंत वास्तव, वस्तुनिष्ठ आणि साहसिक असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. त्यांचा मुद्दा चांगला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र दुर्दैवाने खरे बोलण्याचे साहस आज नागरिकांमध्ये नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जाती व्यवस्था मोडली पाहिजे, असे सांगत त्यांनी देश भ्रष्टाचारमुक्त व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणताही कायदा न्यायासाठी असतो. मात्र त्याच कायद्याने सध्या अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.