शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सच्च्या कलावंताच्या कुटुंबाला हवा मदतीचा आधार

By admin | Updated: October 18, 2016 01:15 IST

चंद्रकांता या गाजलेल्या मालिकेतील यक्कू... असं ओरडणारा तो क्रूरसिंग आठवतोय..?

दशरथ खाडे,

वाडा- चंद्रकांता या गाजलेल्या मालिकेतील यक्कू... असं ओरडणारा तो क्रूरसिंग आठवतोय..? त्याची वेशभूषा ज्याच्याकडे पाहून साकारली होती तो कलावंत म्हणजे शंकर कोकाटे. दरोडेखोरांच्या भूमिका साकारताना जिवंतपणा आणणारा हा कलावंत काही वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेला. आता मात्र एकाकी राहणाऱ्या त्यांच्या पत्नीला मदतीच्या आधाराची गरज आहे. त्यांची पत्नी मंजुळाबाई कोकाटे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले, की कुणाचाही आधार नसताना त्यांनी स्वत:चं आयुष्य घडवलं. नाट्य कला क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला. आजही प्रेक्षक त्यांच्या आठवणी सांगतात. पण, आता आर्थिक परिस्थिती मात्र बेताची होत चालली आहे. कुणाचाही तसा आधार उरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या आठवणींनी उर भरून येतो. डोळ्यांत आसवं जमा होतात. आता त्यांच्याच आठवणीवर जगत आहे. या कुटुंबाची परिस्थिती सध्या बिकट असून त्यांचा मुलगाही जग सोडून गेल्याने मंजुळाबाई एकाकी विपन्नावस्थेत जगत आहेत. कलावंताच्या कुटुंबीयांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी मंजुळाबाई कोकाटे यांनी केली आहे. अभिनेते शंकर कोकाटे यांनी अवघ्या दहाव्या वर्षी गाव सोडले आणि मुंबईला पळून गेले. एका पिरामध्येच राहून ते लहानाचे मोठे झाले. हळूहळू नाटकात काम करू लागले. मुंबई येथील लालबागच्या थिएटरमध्ये सुरंगी या नाटकाचा प्रयोग सुरू होता, त्या वेळी नामवंत तमाशामालक तुकाराम खेडकर यांनी त्या नाटकातील कोकाटे यांचे काम पाहिले आणि ते प्रभावित झाले. तिथून ते तमाशात आले व अभिनयाने त्यांनी लोकांना भुरळ घातली.>...अन् महिला पडली बेशुद्धत्यांच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक सांगतात, की एका वगनाट्यात शंकर कोकाटे यांनी महाकालीचे पात्र केले होते. महाकालीला ओवाळण्यासाठी तमाशातील महिला कलावंत उभी होती. शंकर यांचे आगमन होताच त्यांचा आवाज, उग्ररूप पाहून ती महिला बेशुद्ध पडली.>कोकाटेंमुळेच साकारला क्रूरसिंगमास्टर शंकरराव कोकाटे हा एक वेगळाच कलावंत होता. सुरंगी नाटकात त्यांनी दरोडेखोराचे काम केले आहे. त्या नाटकाचे फोटो नारायणगावच्या राजकमल हॉटेलमध्ये लावलेले आहेत. या फोटोंतील कोकाटे यांची वेशभूषा पाहूनच चंद्रकांता या गाजलेल्या मालिकेतील क्रूरसिंगची भूमिका साकारली गेली... - रघुवीर तुळाशीलकर, नेपथ्यकार